Virat Kohli interview Gautam Gambhir: ...चला सर्व 'मसाला'च संपवून टाकूयात; विराट अन् गंभीरची भारी मुलाखत Video

Virat Kohli interview Gautam Gambhir Video Goes Viral: भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि विराट कोहली यांची मुलाखत घेऊन बीसीसीआयने सर्वांना सुखद धक्का दिला.
Virat Gambhir interview
Virat Gambhir interview esakal
Updated on

Latest Cricket Interview Between Virat Kohli & Gautam Gambhir: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी IND vs BAN पहिल्या कसोटीच्या आधी फ्री-व्हीलिंग गप्पा मारल्या. BCCI ने हा व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. या दोघांमध्ये आयपीएलमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर यांच्यात वाद असल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि विराटने या मुद्यावरूनच मुलाखतीची सुरुवात केली. त्यावर ता 'मसाला' व 'फोडणी' आताच संपवून टाकूयात असे दोघांनी म्हटले. २०११ च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग असलेल्या गंभीर आणि कोहली यांनी मैदानावरील वाद, त्यांची मानसिकता आणि बऱ्याच मुद्यांवर गप्पा मारल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.