Cricket Funny Moments: 'जा बॉलच देत नाय...', भारतीय फलंदाजाने Six हाणला, अन् चिडलेला तो चेंडू न देण्यावर ठाम राहिला

A man refused to return ball : तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेदरम्यान एका सामन्यात मैदानाबाहेर गेलेला चेंडू एका व्यक्तीने चिडून परतच न दिल्याची घटना घडली.
TNPL Funny Cricket moment
TNPL Funny Cricket momentSakal
Updated on

TNPL Cricket: क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. असाच एक प्रकार तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत पाहायला मिळालाय. षटकार गेलेला चेंडूच एका व्यक्तीने चिडून परत न देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसले.

क्रिकेटमध्ये बऱ्याचदा जर चेंडू मैदानाबाहेर प्रेक्षकांकडे गेला, तर तो परत केला जातो किंवा जर चेंडू स्टेडियमच्याच बाहेर गेला किंवा हरवला, तर तो बदलला जातो.

मात्र, रविवारी तामिळनाडू प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत झालेल्या चेपॉक सुपर जाईल्स विरुद्ध सिएचेम मदुराई पँथर्स सामन्यादरम्यान एका व्यक्तीने चेंडूच परत केला नाही. हा सामना दिंडिगुल येथील एनपीआर कॉलेज ग्राऊंडवर झाला.

TNPL Funny Cricket moment
Fox in Cricket Ground: पाहावं ते नवलंच! क्रिकेटच्या मैदानाच चक्क कोल्ह्यानं ठोकली धूम, Video होतोय तुफान व्हायरल

या सामन्यादरम्यान सिएचेम मदुराई पँथर्सचा वेगवान गोलंदाज गोलंदाजी करत असताना चेपॉक सुपर जाईल्सच्या फलंदाजाने पुढे येत मिड विकेटवरून मोठा शॉट खेळला होता. त्यावेळी चेंडू मैदानातून बाहेर गेलेला. यावेळी चेंडू पाहण्यासाठी कॅमेराही झुम करण्यात आलेला.

त्याचवेळी कॅमेऱ्यात तेथील स्थानिक व्यक्तीने तो चेंडू हातात घेतल्याचे टिपले. विशेष म्हणजे व्हिडिओमध्ये जे दिसलं, त्यावरून तरी तो व्यक्ती त्याच्याकडे चेंडू आल्याने प्रचंड चिडल्याचेही दिसला. त्याने तो चेंडूही परत न करण्याचा निर्णय घेत तो तसाच पुढे गेल्याचे दिसले.

या घटनेचा व्हिडिओ स्टार स्पोर्ट्सने शेअर केला असून सध्या तुफान व्हायरल होत आहे.

TNPL Funny Cricket moment
Cricket Funny Video: जरा हटकेच! फलंदाजानं भारी शॉट मारला, नॉन-स्ट्रायकर मध्ये आला अन् कॅच झाला

दरम्यान सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर सिएचेम मदुराई पँथर्सने हा सामना ९ धावांनी जिंकला. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १९१ धावा केल्या होत्या.

मदुराईकडून सुरेश लेकेश्वरने ५५ धावा केल्या, तर जे कौशिकने ४३ धावा केल्या. चेपॉककडून गोलंदाजी करताना अभिषेक तन्वर, बाबा अपराजित, एम सिलंबरासन आणि अश्विन ख्रिस्ट यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेपॉक सुपर जाईल्स संघाला २० षटकात ८ बाद १८२ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून प्रदोष रंजन पॉलने ५२ धावा केल्या, तर डी संतोष कुमारने ४८ धावा केल्या. मदुराईकडून गोलंदाजी करताना कार्तिक मनिकंदनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.