Arjun Tendulkar ची भेदक गोलंदाजी; एकाच सामन्यात ९ विकेट्स घेत संघाला डावाने जिंकवलं; पाहा Video

Arjun Tendulkar 9 Wickets Video: अर्जुन तेंडुलकर सध्या गोव्याकडून खेळत असून त्याने नुकतेच एका सामन्यात ९ विकेट्स घेतल्या आहेत.
Arjun Tendulkar
Arjun TendulkarSakal
Updated on

Arjun Tendulkar Bowling Video: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर गेल्या काही वर्षांपासून गोवा संघाकडून खेळत आहे. आता त्याने नुकतीच गोव्याकडून अफलातून कामगिरी केली आहे.

कर्नाटकमध्ये सध्या डॉक्टर के थिमाप्पिया मेमोरियन टूर्नामेंट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत गोवा संघाने KSCA XI विरुद्ध एक डाव आणि १८९ धावांनी विजय मिळवला. या विजयात अर्जुनने ९ विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.

या तीन दिवसीय सामन्यात दोन्ही डावात गोव्याचे गोलंदाज चमकले. त्यातही वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अर्जुनने KSCA XI संघाच्या फलंदाजांना चांगलाच संघर्ष करायला लावला. त्याने या सामन्यात पहिल्या डावात १३ षटके गोलंदाजी करताना ४१ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. तसेच त्याने दुसऱ्या डावात १० षटकात ५५ धावांत ४ विकेट्स घेतल्या.

Arjun Tendulkar
''तो कोळसाच आहे...''; Arjun Tendulkar च्या भविष्यावर योगराज सिंग यांचा 'तो' वादग्रस्त Video Viral
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.