IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपर फॅन'ला कानपूरमध्ये मारहाण? पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये हालवलं, Video आला समोर

Bangladesh fan rushed to hospital after allegedly attacked : भारत विरुद्ध बांगलादेश संघात कानपूरला दुसरा कसोटी सामना होत आहे. या सामन्यादरम्यान बांगलादेशच्या सुपर फॅनने त्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
Bangladesh cricket super fan allegedly beaten up | IND vs BAN 2nd Test
Bangladesh cricket super fan allegedly beaten up | IND vs BAN 2nd TestSakal
Updated on

India vs Bangladesh, 2nd Test: बांगलादेश संघ सध्या भारत दौऱ्यावर असून यजमानांविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका सध्या ते खेळत आहेत. या मालिकेत चेन्नईला झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने २८० धावांनी विजय मिळवला होता.

त्यानंतर आता शुक्रवारपासून (२७ सप्टेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. मात्र, या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये एक वाद झाल्याचे समोर आले आहे.

Bangladesh cricket super fan allegedly beaten up | IND vs BAN 2nd Test
Viral Video: कानपूरमध्येही Virat Kohli ची क्रेझ! चक्क ग्राऊंड स्टाफ सदस्यच अचानक जवळ येत पाया पडला

या सामन्यादरम्यान बांगलादेशचा सुपर फॅन म्हणून ओळखला जाणाऱ्या टायगर रॉबी याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले आहे. तो कानपूरला सामना पाहण्यासाठी आला आला. यावेळी काही लोकांनी त्याला मारहाण केल्याचा आरोप त्याने केला असल्याचे समोर आहे होते.

दरम्यान, त्याला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये नेतानाचा व्हिडिओही समोर आला होता. यावेळी त्याला मार लागल्याचे सांगताना तो दिसत होता.

तथापि, उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने अशी माहिती दिली आहे की बांगलादेशच्या चाहत्याला मारहाण झालेली नाही, तर डिहायड्रेशनमुळे त्याला चक्कर आली आणि त्याची प्रकृती आता चांगली आहे.

त्यानंतर आता एएनआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो चाहता सांगत आहे की त्याची प्रकृती खालावल्यानंतर पोलिसांनी त्याला हॉस्पिटलला आणले, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणात आणखी माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पहिल्याच दिवशी सातत्याने पावसाचा व्यक्तय येताना दिसला आहे. नाणेफेकही पावसामुळे उशीराने झाली.

भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, १९६४ सालानंतर पहिल्यांदाच असं झालं की कानपूरमध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधाराने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

Bangladesh cricket super fan allegedly beaten up | IND vs BAN 2nd Test
IND vs BAN: आकाश दीपचा DRS चा आग्रह अन् कॅप्टन रोहितही रिव्ह्यू पाहून शॉक, पाहा Viral Video

तथापि, दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघव्यवस्थापनाने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केलेला नाही. त्यामुळे भारताकडून चेन्नईला झालेल्या पहिल्या कसोटीत खेळलेले ११ खेळाडूच कानपूरमध्येही दुसऱ्या कसोटीत खेळताना दिसत आहेत.

जर भारताने दुसरा कसोटी सामना जिंकला, तर भारतीय संघ मालिका २-० ने जिंकेल. तसेच जरी हा सामना अनिर्णित राहिला, तरी मालिका १-० ने भारतीय संघ जिंकेल. त्यामुळे जर मालिका पराभव टाळायचा असेल, तर बांगलादेशला दुसऱ्या कसोटीत विजय गरजेचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.