James Anderson: शेवटच्या सामन्यापूर्वी अँडरसनचा कहर; 41 व्या वर्षी एकाच डावात घेतल्या 7 विकेट्स, पाहा Video

James Anderson 7 Wickets: जेम्स अँडरसन निवृत्तीचा सामना खेळण्यापूर्वी मोठा धमाका करत 7 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
James Anderson
James Anderson Sakal
Updated on

James Anderson 7 Wickets: इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन लवकरच शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. पण त्याआधी त्याने काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये खेळताना त्याच्या फॉर्मची झलक दाखवली आहे. 41 वर्षीय अँडरसनने एकाच डावात 7 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

30 जूनपासून सुरु झालेल्या लँकाशायर विरुद्ध नॉटिंगघमशायर सामन्यादरम्यान त्याने हा पराक्रम केला. या सामन्यात पहिला डाव लँकाशायरने 9 बाद 353 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर नॉटिंगघमशायर फलंदाजीला उतरले. मात्र अँडरसनच्या वेगापुढे त्यांचे फलंदाज संघर्ष करताना दिसले.

James Anderson
IND vs ZIM T20 Series: भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर रवाना; बीसीसीआयने शेअर केले खेळाडूंचे फोटो

अँडरसनने त्याच्या पहिल्याच स्पेलमध्ये 19 धावात 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने नॉटिंगघमशायरच्या पहिल्या सर्व 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबलेला. त्यानंतर पुन्हा खेळ चालू झाल्यानंतर त्याने आणखी एक विकेट घेतली. नॉटिंगघमशायरचा पहिला डाव 126 धावांवरच संपला. अँडरसनने 16 षटकात 35 धावा खर्च करताना 7 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, लँकाशायरने 227 धावांची आघाडी घेतल्याने त्यांनी नॉटिंगघमला फॉलोऑन दिला. त्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नॉटिंगघमशायरने दुसऱ्या डावात 2 बाद 84 धावा केल्या आहेत. पण अद्यापही ते 143 धावांची पिछाडीवर आहेत.

James Anderson
James Anderson Retirement : बाजूला होण्याची हीच योग्य वेळ... जेम्स अँडरसनने पोस्ट करून सांगितला निवृत्तीचा प्लॅन

अँडरसन घेणार निवृत्ती

दरम्यान, वेस्ट इंडिजचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर येणार असून 10 जुलैपासून 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्सवर खेळवला जाणार आहे. हा सामना अँडरसनचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

त्याने यापूर्वीच घोषणा केली आहे की लॉर्ड्स कसोटीनंतर तो निवृत्ती घेणार आहे. अँडरसनने आत्तापर्यंत 187 कसोटीत 700 विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटीत 700 विकेट्स घेणारा तिसराच गोलंदाज आहे.

Chitra smaran:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.