Rishabh Pant | Duleep Trophy 2024
Rishabh Pant | Duleep Trophy 2024Sakal

Rishabh Pant बनला खबरी? प्रतिस्पर्धी संघाचे प्लॅन ऐकण्यासाठी त्याच्याच गोटात घुसला, पाहा Video

Duleep Trophy 2024, India A vs India B: ऋषभ पंतचा मस्तीखोर स्वभावासाठीही ओळखला जातो. याचाच प्रत्येय दुलीप ट्रॉफीतील सामन्यादरम्यानही आला. तो चक्क प्रतिस्पर्धी संघाचे प्लॅन्स ऐकताना दिसला.
Published on

Rishabh Pant Video: दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीचा सामने पूर्ण झाले आहेत. या फेरीत इंडिया बी संघाने इंडिया ए संघाविरुद्ध ७६ धावांनी विजय मिळवला. इंडिया बी च्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचेही मोठे योगदान राहिले.

दरम्यान, पंत हा त्याच्या मस्तीखोर स्वभावासाठीही ओळखला जातो. त्याचा हा स्वभाव दुलीप ट्रॉफीच्या या सामन्यादरम्यानही दिसून आला. तो फलंदाजी करणाऱ्या कुलदीप यादवबरोबर मजेशीर संवाद साधत त्याला विचलित करतानाही दिसला. याचदरम्यान, त्याचा याच सामन्यातील आणखी एक मजेशीर व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पंतने इंडिया बीकडून दुसऱ्या डावात सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली होती, ज्यामुळे त्यांना इंडिया ए समोर किमान २७५ धावांचे आव्हान ठेवता आले होते. पण या आव्हानाचाही यशस्वी पाठलाग इंडिया ए संघाला करता आला नाही.

Rishabh Pant | Duleep Trophy 2024
Rishabh Pant Video: 'आऊट होना मग...', ऋषभ पंत-कुलदीप यादवचा लाईव्ह सामन्यादरम्यान मजेशीर संवाद
Loading content, please wait...