Shaheen Afridi Video: बाबा झाल्याचा आनंद! शाहिन आफ्रिदीनं विकेट घेत केलं अनोखं सेलिब्रेशन, तर सासऱ्याची भारी पोस्ट, Video

Shaheen Shah Afridi Celebrates Newborn Son's Arrival: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी बाबा झाला असून त्याने त्याचा आनंद विकेट घेतल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनमधून व्यक्त केला.
Shaheen Shah Afridi Celebration
Shaheen Shah Afridi CelebrationSakal
Updated on

Shahid Afridi Special Post: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना २१ ऑगस्टपासून रावळपिंडी येथे सुरू झाला आहे. या सामन्यात वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीही खेळत आहे. याचदरम्यान, अशीही माहिती मिळाली की तो बाबा झाला आहे. त्यामुळे त्याने सामन्यावेळी अनोखं सेलिब्रेशनही केले.

शहिनचे लग्न माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा हिच्याशी सप्टेंबर २०२३ मध्ये झाले होते. त्यानंतर आता शाहिन आणि अंशा यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. त्याचं नाव अली यार असं ठेवल्याचे समजत आहे.

Shaheen Shah Afridi Celebration
PAK vs BAN 1st Test: एकटा टायगर! बांगलादेशने पाकिस्तानला रडकुंडीला आणले; यजमान खेळपट्टीला दोष देऊ लागले
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.