WI vs SA T20I : 6,6,6,6,6,6,6...! निकोलस पूरनसह विंडीजचे तिघं दक्षिण आफ्रिकेवर भारी पडले अन्...

West Indies vs South Africa : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ काल पहिलाच ट्वेंटी-२० सामना खेळला. पण, वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी त्यांना दणका दिला.
WI vs SA 1st T20i
WI vs SA 1st T20iesakal
Updated on

West Indies vs South Africa 1st T20I: वेस्ट इंडिजने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यांत दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय नोंदवला. अॅलिक अथानाझे, निकोलस पूरन आणि शे होप या तिघांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना बेक्कार चोपले. या तिघांच्या फटकेबाजीमुळे विंडीजने १७५ धावांचे लक्ष्य १७.५ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यास सहज पार केले. तीन सामन्यांच्या मालिकेत विंडीजकडे १-० अशी आघाडी आली आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप फायनलमधील पराभवातून सावरून आफ्रिकेचा संघ मैदानावर उतरला. रायन रिकेल्टन व रिझा हेंड्रीक्स हे सलामीवीर एकेरी धावेत माघारी परतले. कर्णधार एडन मार्करामने १४ धावा केल्या, परंतु मॅथ्यू फोर्डने त्याला बाद केले. आफ्रिकेची पडझड सुरू असताना त्रिस्तान स्तब्स व पॅट्रीक क्रुगर यांनी दमदार खेळ केली. स्तब्सने ४२ चेंडूंत ८ चौकार व ३ षटकारांसह ७६ धावा चोपल्या, तर पॅट्रीकने ३२ चेंडूंत ४ चौकार व २ षटकारांसह ४४ धावांची खेळी केली.

WI vs SA 1st T20i
Shikhar Dhawan's Retirement: शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती, पाहा पोस्ट

७१ धावा

क्रुगर आणि स्तब्स यांची ७१ धावांची भागीदारी ही दक्षिण आफ्रिकेसाठी ट्वेंटी-२०तील सहाव्या विकेटसाठी सर्वोत्तम ठरली. यापूर्वी हा विक्रम मार्क बाऊचर व एल्बी मॉर्केल ( ६९ धावा) यांच्या नावावर होता.

६० धावा

बीजॉर्न फॉर्च्यून आणि स्तब्स यांनी सातव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. सातव्या विकेटसाठी आफ्रिकेकडून ही ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी शॉन पोलॉक व एल्बी मॉर्केल यांनी ५७ धावा केल्या होत्या.

विंडीजच्या मॅथ्यूने ३, तर शामर जोसेफने दोन विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजच्या आघाडीच्या फलंदाजांनीच विजयाचा भक्कम पाया रचला. सलामीवीर अथानाझे व होप यांनी ८ षटकांत ८४ धावांची भागीदारी केली. अथानाझे ३० चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ४० धावांवर बाद झाला. त्यानंतर होप अन् पूरन यांनी भार पेलला.. होपने ३६ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. पूरनने सूत्र हाती घेताना सामना संपवला. त्याने २६ चेंडूंत २ चौकार व ७ षटकारांसह ६५ धावांची नाबाद खेळी केली. विंडीजने १७.५ षटकांत ३ बाद १७६ धावा करून विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.