West Indies' Shannon Gabriel retired: बुधवारी (२८ ऑगस्ट) दोन क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आधी इंग्लंडच्या ३७ वर्षीय फलंदाज डेव्हिड मलानने निवृत्ती घेतली. त्यानंतर आता वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शॅनन गॅब्रियलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे.
३६ वर्षीय गॅब्रियलने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. त्याने आंतरारष्ट्रीय कारकिर्दीत २०२ विकेट्स घेतल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अवलिदा केलं असलं तरी गॅब्रिएल त्याचा देश त्रिनिदाद आणि टोबॅगोसाठी आणि फ्रँचायझी क्रिकेट खेळत राहणार आहे.