WI vs SA : निकोलस पूरन, शे होपची तुफान फटकेबाजी; वेस्ट इंडिज तिसऱ्या सामन्यातही दक्षिण आफ्रिकेवर पडले भारी

West Indies vs South Africa 3rd T20I: विंडीजने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर आठ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. विंडीजने ही मालिका ३-० अशी जिंकली.
nicholas pooran
nicholas pooranesakal
Updated on

WI vs SA T20I : निकोलस पूरन, शे होप आणि शिमरॉन हेटमायर यांच्या तुफान फटकेबाजीने वेस्ट इंडिजला तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत विजय मिळवून दिला. वेस्ट इंडिजने तिसरी मॅच ८ विकेट्सने जिंकली आणि मालिका ३-० अशी जिंकली.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. आफ्रिकेची सलामीजोडी रायन रिकल्टन आणि रिझा हेनड्रिक्स यांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. एडन मारक्रमला देखील १२ चेंडूंमध्ये २० धावा करून परतावे लागले. त्रित्सन स्तब्सने १५ चेंडूंमध्ये ४० धावा करत संघाची पडती बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला. त्याने ५ चौकार ३ षटकार ठोकले.

nicholas pooran
आधी आर्मी ट्रेनिंग अन् आता 'AI' ची मदत; पाकिस्तान क्रिकेट संघ निवडण्यासाठी PCB चा जुगाड

१३ षटकांच्या अखेरीस पावसामुळे सामना थांबवावा लागला. तेव्हा आफ्रिकेच्या ४ बाद १०८ धावा झाल्या होत्या. DLS नुसार विंडीजसमोर १३ षटकांमध्ये ११६ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.

विंडीजचा सलामीवीर अलिक अथानाझे याला बीजॉर्न फॉर्टुईने माघारी पाठवले. शे होपने मात्र २४ चेंडूंमध्ये ४२ धावांची नाबाद खेळी खेळली. निकोलस पूरन देखील जलद गतीने १३ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारासह ३५ धावा करून संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेला. शिमरॉन हेटमायरने १७ चेंडूंमध्ये ३१ धावांची विजयी खेळी केली. विंडीजने ९.२ षटकांत हा सामना जिंकला.

nicholas pooran
T20 क्रिकेट गाजवलेल्या स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; निवृत्तीची घोषणा करत दिला धक्का

गोलंदाज रोमारिओ शेफर्डचे देखील विंडीजच्या विजयामध्ये मोलाचे योगदान आहे. कारण त्याने आफ्रिकेचे महत्वाचे दोन बळी घेऊन धावसंख्या रोखण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याव्यतिरिक्त अकील हुसेन आणि मॅथ्यू फोर्डने प्रत्येकी १-१ बळी घेतले.

वेस्ट इंडिजची पुढची मालिका ३१ ऑक्टोबर पासून इंग्लंडविरुद्ध होणार आहे. या मालिकेत ५ वन डे सामने खेळवले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.