R Ashwin on Rohit Sharma Captaincy: भारतीय क्रिकेटच्या दिग्गज कर्णधारांमध्ये एमएस धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचं नाव नेहमीच घेतलं जातं. हे तिघेही बराच काळ एकत्र खेळले आहेत. रोहित आणि विराट हे बराच काळ धोनीच्या नेतृत्वात खेळले. तर नंतर धोनी काही वर्षे विराटच्या नेतृत्वात खेळला.
त्यामुळे अनेकदा या खेळाडूंच्या नेतृत्वाची तुलनाही केली जाते. त्यांच्या नेतृत्वाबद्दल अनेकांनी आपापली मतंही मांडली आहेत. आता भारताचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विनने या तिघांच्या नेतृत्वाबद्दल मत मांडतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की एका पत्रकाराशी बोलताना अश्विनने रोहित शर्माचे नेतृत्व धोनी आणि विराट यांच्यापेक्षा वेगळे कसे आहे, हे सांगताना म्हणाला, 'दोन-तीन गोष्टी आहेत, ज्या रोहित शर्माच्या नेतृत्वातील चांगल्या आहेत.'
'तो नेहमीच संघातील वातावरण हलकं-फुलकं ठेवतो. त्यासाठी तो प्रयत्न करतो. तो समतोला राखतो आणि तांत्रिकदृष्याही तो भक्कम आहे. धोनी आणि विराटही तांत्रिक गोष्टींचा विचार करतात, पण रोहित त्यावर अधिक भर देतो.