Sachin Tendulkar Birthday: जेव्हा युवा सचिन भेटलेला दिग्गज सर डॉन ब्रॅडमनला; काय झालेलं त्या भेटीत

Sachin Tendulkar - Don Bradman: सचिनच्या एका प्रश्नावर सर डॉन ब्रॅडमन यांनी गमतीशीर उत्तर दिलेलं, जाणून घ्या त्या संभाषणाबद्दल
Sachin Tendulkar - Don Bradman
Sachin Tendulkar - Don BradmanX/ICC
Updated on

Sachin Tendulkar - Don Bradman: क्रिकेटमधील महान फलंदाजांबद्दल जेव्हाही चर्चा केली जाते, त्यात हमखास दोन नावं येतात; ती दोन नावं म्हणजे एक ऑस्ट्रेलियाचे दिग्गज डॉन ब्रॅडमन आणि भारताचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर.

खरंतर दोघंही अगदी वेगवेगळ्या काळात क्रिकेट खेळले. पण दोघांनीही आपापल्या काळात फलंदाजीची नवी उंची गाठली. दरम्यान, या दोन दिग्गजांची एकदा अविस्मरणीय अशी भेट झाली होती. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेबद्दलही सचिन तेंडुलकरने एबीसी ऑस्ट्रेलियाच्या डॉक्युमेंट्रीमध्ये सांगितले आहे.

सचिनसाठी 1998 वर्ष शानदार राहिलं होतं. तो क्रिकेट मैदानं तर गाजवत होताच, पण त्याला त्यावर्षी ब्रॅडमन यांच्या 90व्या वाढदिवसाचं आमंत्रण होतं. त्याच्याबरोबर त्यांच्या घरी जाणार होता. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू आणि सचिनचा मित्र शेन वॉर्न.

Sachin Tendulkar - Don Bradman
Sachin Surprises Fan : 'तेंडुलकर आय मीस यू' जर्सी घातलेल्या चाहत्याला सचिनचं भररस्त्यात सरप्राइज! Video एकदा पाहाच

सचिन-वॉर्नचं 'तू की मी'

सचिनने या भेटीबद्दल सांगितलं, 'मी तेव्हा चेन्नईमध्ये कॅम्पमध्ये होतो आणि माझ्या मॅनेजरने मला सांगितले की सर डॉन यांचा 90 वा वाढदिवस आहे, त्यांनी मला ऑस्ट्रेलियाला बोलायवलंय आणि शक्य झाल्यास त्यांच्या घरी भेटायला सांगितलंय.'

'2 होल्डन स्ट्रिटवर असलेल्या सर डॉन यांच्या घरी जातानाचा अनुभव अविस्मरणीय होता. यातही गमतीची गोष्ट अशी की मी वॉर्नबरोबर त्यांच्या घरी जात होतो आणि वॉर्न मला म्हणाला की संभाषण तू चालू कर, त्यावर मी त्याला म्हणाला, तू ऑस्ट्रेलियाचा आहेस, तू इथला स्थानिक आहेस, तर तूच संभाषण चालू केलं पाहिजेस, मी नाही.'

'वॉर्नने त्यावर मला सांगितलं, मी त्यांच्याबरोबर काय बोलू? तूम्ही दोघं फलंदाज आहात, तुम्ही फलंदाजीबद्दल बोलू शकतात.'

सचिनने पुढे सांगितलं की सर ब्रॅडमन खूप हुशार होते आणि त्यांना क्रिकेटमध्ये काय चालूये हे माहित होतं.

Sachin Tendulkar - Don Bradman
Ruturaj Gaikwad CSK vs LSG : आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, धोनीला जमलं नाही ते ऋुतूनं करून दाखवलं

ब्रॅडमन यांचं मजेशीर उत्तर

सचिनने पुढे सांगितलं की 'त्यावेळी आम्ही सहाजिकच सर डॉन यांना एक प्रश्न विचारला, सध्याच्या क्रिकेटमध्ये (1990 च्या दशकात) तुमची सरासरी काय असती?'

त्यावर ब्रॅडमन यांनी सांगितलं की, 'कदाचीत 70 च्या जवळपास.' हे उत्तर ऐकून सचिनला मात्र आर्श्चर्य वाटलं. कारण ब्रॅडमन यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सरासरीही 99.96 आहे. पण नंतर ब्रॅडमन यांनी त्यांच्या उत्तरामागील गमतीशीर कारणही सचिनला सांगितलं. ब्रॅडमन यांनी सांगितलं की 'मुला, 90 वर्षाच्या व्यक्तीसाठी 70 ची सरासरी काही वाईट नाही ना.'

याशिवाय सचिनने सांगितलं की त्यानं ब्रॅडमन यांना त्यांच्या खेळण्यावेळीच्या मानसिकतेबद्दलही विचारलं होतं, ज्यावर त्यांनी सांगितलं की ते सराव करायचे आणि धावा करायचे. इतकंच साध्या गोष्टी त्यांनी ठेवल्या होत्या.

दरम्यान, याच डॉक्युमेंट्रीमध्ये ब्रॅडमन यांनी त्यांच्या पत्नीकडे सचिनबद्दल कौतुक केल्याचंही सांगण्यात आलं होतं. त्यांनी सचिनबद्दल म्हटलं होतं की असं वाटतं तो माझ्यासारखाच खेळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.