Ind vs Eng : टीम इंडियाच्या कॅम्पमधून मोठी बातमी; जसप्रीत बुमराह राजकोटमध्ये गायब? खेळण्यावर प्रश्नचिन्ह

Where is Jasprit Bumrah : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराहबाबत मोठी बातमी समोर येत आहे....
Jasprit Bumrah Marathi News
Jasprit Bumrah Marathi Newssakal
Updated on

India vs England 3rd Test News : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आणि उपकर्णधार जसप्रीत बुमराहबाबत मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा वेगवान गोलंदाज अद्याप राजकोटला पोहोचलेला नाही.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी राजकोटमध्येच होणार आहे. 15 फेब्रुवारीपासून हा सामना सुरू होणार असून त्यासाठी सर्व खेळाडू तयारीत व्यस्त आहेत, मात्र या खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह दिसत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार बुमराह संघाच्या सरावातही दिसला नाही.

Jasprit Bumrah Marathi News
Ishan Kishan : भारतीय संघात निवड होत नसल्यामुळे इशान किशन घेतला मोठा निर्णय; IPL 2024 आधी खेळणार 'ही' स्पर्धा?

क्रिकबझच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह सतत सराव सत्रांना अनुपस्थित आहे. त्यामुळे बुमराह तिसऱ्या कसोटीत प्लेइंग 11 चा भाग असेल की नाही हे चित्र बुधवारी स्पष्ट होऊ शकते. मधल्या फळीतील अनुभवाची कमतरता लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनही 5 ऐवजी 4 गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा विचार करत आहे.

6 दिवसांच्या विश्रांतीनंतर 11 फेब्रुवारीलाच भारतीय संघ राजकोटला आला. टीम इंडियाचे खेळाडू 11 फेब्रुवारीपासून तिसऱ्या कसोटीसाठी सराव करत आहेत. मात्र बुमराह अद्याप सराव शिबिराचा भाग बनलेला नाही.

Jasprit Bumrah Marathi News
Ind vs Eng : राजकोट खेळपट्टीबाबत सावध पवित्रा ; भारतीय संघाची मदार पुन्हा जसप्रीत बुमरा आणि त्याच्या रिव्हर्स स्विंगवर?

क्रिकबझच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह बुधवारी सराव सत्रात भाग घेऊ शकतो. जसप्रीत बुमराहला तिसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात येणार असल्याचे सुरुवातीला बोल्या जात होते. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीदरम्यान 10 दिवसांच्या अंतरामुळे जसप्रीत बुमराहच्या खेळण्याची शक्यता वाढली आहे. बुमराह तिसऱ्या कसोटीत खेळणार असून त्याला चौथ्या कसोटीतून विश्रांती दिली जाऊ शकते, असा दावा अलीकडील काही अहवालात करण्यात आला आहे.

Jasprit Bumrah Marathi News
Wrestling Federation of India : युनायटेड वर्ल्ड रेसलिंगचा मोठा निर्णय! भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन घेतलं मागे

जसप्रीत बुमराह तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही हे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. विराट कोहली आणि केएल राहुलच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची बॅटिंग लाइनअप खूपच कमकुवत दिसत आहे. अशा परिस्थितीत सर्फराज खानसह देवदत्त पडिक्कलला फलंदाजीची फळी मजबूत करण्यासाठी पदार्पणाची संधी मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.