BCCI Central Contract : अय्यरला वगळले, हार्दिकला गोंजरले; पांड्याला न खेळता मिळाला वार्षिक करार... BCCIने केला अन्याय?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी या वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची यादी बुधवारी जाहीर केली.
BCCI contracts Hardik Pandya Shreyas Iyer Marathi News
BCCI contracts Hardik Pandya Shreyas Iyer Marathi News
Updated on

BCCI Annual Contract : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) बुधवारी या वर्षासाठी करारबद्ध खेळाडूंची यादी बुधवारी जाहीर केली. ज्यामध्ये एकूण सात खेळाडूंना केंद्रीय करारातून बाहेरचा रस्ता दाखवला. या यादीत श्रेयस अय्यर, इशान किशनपासून ते युझवेंद्र चहल आणि चेतेश्वर पुजारापर्यंतच्या नावांचा समावेश आहे.

अय्यर-इशानने रणजी ट्रॉफी खेळण्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे या दोघांना बीसीसीआयने चांगला धडा शिकवला आहे. इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये अय्यर मैदानात उतरला होता. पण त्याला फारशी छाप सोडता आली नाही. त्याने चार डावात केवळ 104 धावा केल्या, त्यानंतर मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी त्याची निवड झाली नाही.

BCCI contracts Hardik Pandya Shreyas Iyer Marathi News
James Anderson : रिव्हर्स स्विंगची कला झहीरकडून शिकलो ; इंग्लंडचा विख्यात वेगवान गोलंदाज अँडरसनकडून स्तुती

अय्यरला केंद्रीय करार न मिळाल्याने चाहते संतापले असून सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत आहेत. अय्यरने 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती, ज्यामध्ये त्याने 11 सामन्यांमध्ये 530 धावा केल्या होत्या. त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली होती.

BCCI contracts Hardik Pandya Shreyas Iyer Marathi News
Pro Kabaddi : पुणेरी पलटणची अंतिम फेरीत धडक ; विजेतेपदासाठी हरियाना स्टीलर्स संघाविरुद्ध सामना

दुसरीकडे गेल्या सहा महिन्यांपासून एकही सामना न खेळलेल्या हार्दिक पांड्याला बोर्डाने आपल्या करारात कायम ठेवले आहे. यावरून चाहते प्रचंड संतापले आहेत. पांड्या वर्ल्ड कपच्या मध्यात दुखापतीमुळे बाहेर गेला होता. यानंतर तो रिकव्हरीच्या टप्प्यातून जात असल्याचे दिसले आणि आता तो डीवाय पाटील टी-20 चषक स्पर्धेतही खेळत आहे.

त्यामुळे श्रेयस अय्यरला वगळल्यानंतर चाहत्यांनी हार्दिक पांड्याच्या करारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. हार्दिक पांड्या खेळला नाही तरीही त्याला करार मिळाला आहे. आणि अय्यरने वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली होती पण त्याला वगळण्यात आले. त्यामुळे बीसीसीआयवर अन्याय केल्याचा आरोप होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()