IND vs SL: सॅमसनच्या ऐवजी ऋषभ पंतला का मिळाली वनडे संघात जागा? रोहित शर्मा ठरला मास्टरमाइंड

Rishabh Pant or Sanju Samson: श्रीलंका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी संजू सॅमसनच्या ऐवजी यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतला का संधी देण्यात आली, याचं कारण समोर आले आहे.
Rishabh Pant | Sanju Samson | Rohit Sharma
Rishabh Pant | Sanju Samson | Rohit SharmaSakal
Updated on

Why Rishabh Pant Got selected Ahead of Sanju Samson in ODI Squad: भारतीय क्रिकेट संघाला श्रीलंकेमध्ये २७ जुलैपासून ३ सामन्यांची टी२० आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकांसाठी भारतीय संघ श्रीलंकेत पोहचला आहे.

दरम्यान, या दौऱ्यातील टी२० मालिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून ऋषभ पंतसह संजू सॅमसनला संधी देण्यात आली, मात्र त्याला वनडे संघात स्थान मिळाले नाही.

महत्त्वाचे म्हणजे संजू सॅमसनने त्याच्या अखेरच्या वनडे सामन्यात शतक केले होते. पण असं असतानाही त्याला वनडे संघातून बाहेर करण्यात आल्याने बरीच टीका भारतीय संघाच्या निवड समितीवर झाली होती.

श्रीलंका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी केएल राहुल आणि ऋषभ पंतची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड झाली. आता असे समजत आहे की निवड समितीची जी बैठक झाली, त्यात वनडेमध्ये सॅमसन की पंत यांच्यापैकी कोणाला निवडले जावे, यावर बरीच चर्चा झाली होती. पण पंतला का निवडण्यात आले, याचे कारण आता समोर आले आहे.

Rishabh Pant | Sanju Samson | Rohit Sharma
IND vs SL: मॉर्ने मॉर्केल नाही, तर 'हा' माजी भारतीय खेळाडू श्रीलंका दौऱ्यात असणार टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक

आजतकशी बोलताना बीसीसीआयच्या एका सुत्राने सांगितले की जेव्हा ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्याबाबत चर्चा सुरू होती, तेव्हा रोहित शर्माने हस्तक्षेप केला. रोहितने बीसीसीआयच्या बैठकीत वनडेत ऋषभ पंतसह जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संजू सॅमसनला केवळ टी२० संघात जागा मिळाली.

दरम्यान, गुरुवारी (१८ जुलै) भारतीय संघाची घोषणा होण्यापूर्वी निवड समितीच्या बुधवारी आणि गुरुवारी अशा दोनदा बैठका झाल्या होत्या.

सुत्राने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही बैठका ऑनलाईन झाल्या, ज्यात निवड समिती सदस्य, रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर सामील होते. तसेच पहिल्या दिवशी बीसीसीआय सचिव जय शाह देखील होते. त्यांनी निवड समितीला सांगितले होते की संघ निवड करण्याचा हक्क हा निवड समितीलाच असेल.

Rishabh Pant | Sanju Samson | Rohit Sharma
IND vs SL : स्वॅग! गौतम गंभीर युगाची सुरुवात; पाहा टीम इंडियाचा मुंबई टू श्रीलंका प्रवास, Video

तथापि, भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना आगरकरने केएल राहुलने २०२३ वर्ल्ड कपमध्ये केलेल्या कामगिरीचा उल्लेख केला होता.

तसेच जो संघातून बाहेर होतो, त्याच्यासाठी हे कठीणच असते, पण संघात केवळ १५ जणांनाच जागा मिळू शकते, असं म्हटलं होतं. त्याचबरोबर पंतने अपघातानंतर पुनरागमन केल्यावर केवळ टी२० क्रिकेट खेळले आहे, अशा आता तो वनडेतही चांगली कामगिरी करेल, अशी आश आगरकरने व्यक्त केली होती.

केएल राहुलच्या वनडेतील कामगिरीबद्दल सांगायचे झाले, तर तो डिसेंबर २०२३ च्या अखेरीस वनडे मालिका खेळला होता. ज्यात त्याने दक्षिण आफ्रिकविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत ७७ धावा केल्या होत्या. त्याने त्याआधी वनडे वर्ल्ड कपमध्ये ११ सामन्यांमध्ये ७५.३३ च्या सरासरीने ४५२ धावा केल्या होत्या. यामध्ये एका शतकाचा आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

Crossword Mini:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.