श्रीलंका vs भारत मॅच टाय झाली तरी का नाही सुपर ओव्हर? जाणून घ्या ICCचा 'हा' नियम

India vs Sri Lanka 1st ODI : रोहित शर्मा, विराट कोहली असे दिग्गज फलंदाज खेळत असतानाही भारताला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयाची संधी साधता आली नाही.
Why There Was No Super Over in India vs Sri Lanka 1st ODI 2024 Despite Tied Match
Why There Was No Super Over in India vs Sri Lanka 1st ODI 2024 Despite Tied Matchsakal
Updated on

India vs Sri Lanka 1st ODI Super over Rules : रोहित शर्मा, विराट कोहली असे दिग्गज फलंदाज खेळत असतानाही भारताला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजयाची संधी साधता आली नाही. धावसंख्या बरोबरीत असताना भारताने सलग दोन फलंदाज गमावले, परिणामी हा सामना टाय झाला.

त्यानंतर बहुतेक चाहत्यांच्या मनात प्रश्न पडतो की, स्कोअर बरोबरी झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हर का घेण्यात आली नाही. जाणून घेऊया यामागचे कारण....

Why There Was No Super Over in India vs Sri Lanka 1st ODI 2024 Despite Tied Match
Paris Olympic 2024 Day 8: मनू भाकर तिसरं पदक जिंकणार अन् तिरंदाजीत इतिहास रचला जाणार? पाहा आठव्या दिवसाचं वेळापत्रक

श्रीलंकेच्या २३० धावांसमोर रोहित शर्माने झंझावाती ५८ धावांची खेळी करत गिलसह वेगवान ७५ धावांची सलामी दिली होती. त्यानंतर डावाच्या मध्यावर विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि अक्षर पटेल यांनी योगदान दिल्यामुळे विजय भारताच्या अवाक्यात होता, परंतु हे फलंदाज महत्त्वाच्या क्षणी बाद होत गेल्यामुळे दडपण वाढले.

शिवम दुबेने वेगवान २५ धावांची खेळी केली. त्यामुळे भारत हा सामना दोन षटके अगोदरच जिंकायला हवा होता, परंतु २३० या धावसंख्येवर दुबे बाद झाला आणि अखेरचा फलंदाज अर्शदीपने पुढच्याच चेंडूवर विकेट बहाल केली. त्यामुळे भारताच्या तोंडचा घास हिरावला.

Why There Was No Super Over in India vs Sri Lanka 1st ODI 2024 Despite Tied Match
Paris Olympic 2024 Day 7: तिरंदाजीत पदक हुकलं, पण मनू भाकर तिसऱ्यांदा फायनलमध्ये, तर लक्ष्य सेनची आगेकूच; दिवसभरात काय घडलं?

सुपर ओव्हर म्हणजे काय?

क्रिकेट सामन्यात, जेव्हा दोन संघांमध्ये खेळला जाणारा सामना बरोबरीवर सोडतो, तेव्हा सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे निश्चित केला जातो. मात्र, हा नियम फक्त एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये वापरला जातो. या नियमानुसार, दोन्ही संघांना 1-1 ओव्हर खेळायला मिळते आणि प्रत्येक संघातील केवळ 3-3 फलंदाजांना फलंदाजीची संधी मिळते.

Why There Was No Super Over in India vs Sri Lanka 1st ODI 2024 Despite Tied Match
IND vs SL ODI: श्रीलंकेला अतिघाई नडली, फलंदाज नॉटआऊट असूनही परतला पॅव्हेलियनमध्ये अन् मग...; नक्की घडलं काय?

श्रीलंका vs भारत मॅच टाय झाली तरी का नाही सुपर ओव्हर?

खरं तर, आयसीसीच्या नियमांनुसार प्रत्येक टाय झालेल्या टी-20 सामन्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारे लावणे अनिवार्य आहे. पण ODI फॉरमॅटमध्ये हा नियम फक्त ICC टूर्नामेंटमध्ये वापरला जातो. वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत फक्त तीन वेळा सुपर ओव्हर पाहायला मिळाली आहे. यामुळेच भारत आणि श्रीलंका यांच्यातील टाय झालेल्या या वनडे सामन्यात चाहत्यांना सुपर ओव्हर पाहायला मिळाली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.