WI vs ENG 1st ODI: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात पाऊस पडला. पण, चांगल्या रनरेटमुळे वेस्ट इंडिजने ८ विकेट्सने बाजी मारली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ४५ षटकांत सर्वबाद २०९ धावा उभारल्या. तर, वेस्ट इंडिजने तुफान फटकेबाजीसह २६ षटकांमध्येच १५७ धावा करत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर सामन्यात पावसाने हजेरी लावली आणि डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार वेस्ट इंडिजला विजयी घोषित करण्यात आले. एव्हिन लुईसच्या ९४ धावांच्या जलद खेळीमुळे पावसाच्या उपस्थितीनंचरही वेस्ट इंडिजला सामना जिंकता आला.
श्रीलंकेकडून तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत २-१ ने पराभव पत्कारल्यानंतर वेस्ट इंडिज घरच्या मैदानावर इंग्लंडविरूद्ध तीन सामन्यांची वन-डे मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना सर विवान रिचर्डसन मैदानावर खेळवण्यात आला. विंडीजने नाणेफेक जिंकत घरच्या मैदानावर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. लियाम लिव्हिंगस्टोनने चांगल्या स्ट्राईक रेटने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे अर्धशतक २ धावांनी हुकले. लिव्हिंगस्टोन आणि सॅम करनने सामन्यात ७२ धावांची भागीदारी केली. अन्यथा इतर फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. त्यामुळे इंग्लंडचा डाव २०९ धावांवर गुंडाळण्यात विंडीजला यश आले.
वेस्ट इंडिजच्या सालामीजोडीने १९व्या षटकापर्यंत ११८ धावांची शतकी भागिदारी केली. ज्यामध्ये ब्रॅंडन किंग मैदानावर स्थिरावण्याच्या प्रयत्नात असताना ५६ चेंडूत ३० धावांची खेळी करून बाद झाला. तर दुसऱ्या बाजूने एव्हिन लुईस दमदार फटकेबाजी करत होता. लुईसने ६९ चेंडूत ५ चौकार व ८ षटकार ठोकत ९४ धावा केल्या. तो षटकापासून अवघ्या ६ धावांनी वंचित राहीला.
२६ व्या षटकातील ५ शेवटच्या चेंडूवेळी पावसाने हजेरी लावली आणि खेळ थांबवण्यात आला. विंडीजने २६ व्या षटकापर्यंत ६.०८ च्या सरासरीने २ विकेट्स गमावून १५७ धावा केल्या होत्या. त्यामुळे नंतर विंडीजला डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार विजयी घोषित करण्यात आले. विंडीजने सामना ८ विकेट्सने जिंकला. ज्यावेळी केसी कार्टी १९ व शे होप ६ धावांवर नाबाद होते. विंडीजने सामना जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.