ICC Champions Trophy 2025: साल २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तान संघाकडे आहे. मात्र आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपल्याच चुकीमुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद गमवणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PBC)चे अध्यक्ष मोहसीन नक्वी म्हणाले की, "आयसीसीचे नवनिर्वाचित अध्यक्ष जय शाह यांच्यासोबत आमचा संपर्क चालू आहे. त्यामुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानमध्ये होईल हे नक्की आहे."
असे असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने बीसीसीआयकडून पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही.
सुरक्षेच्या मुद्द्यावर बोलत असताना पाकिस्तानचे माजी खेळाडू बसित अली म्हणाले की, "बांगलादेश, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड विरुद्धच्या आगामी मलिकेदम्यान कोणत्याही सुरक्षा त्रुटी आढळल्यास पाकिस्तानला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपद गमवावे लागू शकते."
अशातच पाकिस्तान ऑक्टोबरमध्ये तीन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडचे यजमानपद भूषवणार आहे. परंतु मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. पाकिस्तानमधील मैदानांमध्ये सुरू असलेल्या बांधकामामुळे ही मालिका पाकिस्तानच्या बाहेर हलवली जाऊ शकते असे म्हटले जात होते.
पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी पाकिस्तानमध्ये सामने आयोजित करण्यावर ठाम आहेत. ते म्हणाले की, "सामने देशाबाहेर हलवल्यास पीसीबीची प्रतिमा खराब होईल. ते विलंबाने खूश नाहीत कारण त्याचा परिणाम मंडळाच्या महसूल निर्मितीच्या संधींवर होतो."
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र होण्यासाठी पाकिस्तानला इंग्लंडचा ३-० ने पराभव करण्याची गरज आहे. मालिकेला अवघे तीन आठवडे उरले असताना पीसीबीला अद्याप मालिकेतील पहिला सामना कुठे खेळवला जाईल याची खात्री नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही अद्याप मालिकेची रुपरेषा कशी असेल, याबाबत स्पष्ट कल्पना नसल्याने पाकिस्तान आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड चिंतेत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या याअस्पष्ट कारभरामुळे पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद गमवणार की काय असा प्रश्न पडतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.