WPL 2024 GGW vs MIW : मुंबईच्या एमेलियासमोर गुजरातनं गुडघे टेकले, विजयासाठी ठेवलं माफक आव्हान

Amelia Kerr
Amelia Kerresakal
Updated on

WPL 2024 GGW vs MIW : महिला प्रीमियर लीग 2024 तिसऱ्या सामन्यात आज मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सला चांगलाचे दमवले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात जायंट्सला मुंबईने 20 षटकात 9 बाद 126 धावात रोखले.

मुंबईकडून लेग स्पिनर एमेलिया केरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या तर शबनिम इस्माईलने 3 विकेट्स घेत गुजरातच्या फलंदाजीला मोठं खिंडार पाडलं. गुजरातकडून तनुजा कनवरने सर्वाधिक 28 धावा केल्या. तर कॅथरिन ब्रिसने नाबाद 25 धावांची खेळी केली.

Amelia Kerr
Cheteshwar Pujara : पुजाराने पुन्हा ठोठावलं टीम इंडियाचं दार, संघ हरला मात्र चेतेश्वर लढला

महिला प्रीमियर लीगमधील दुसऱ्या हंगामात गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ आज गुजरात जायंट्सशी भिडत आहे. मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हा निर्णय वेगवान गोलंदाज शबनिम इस्माईलने योग्य ठरवत गुजरातला पहिले दोन धक्के दिले. त्यानंतर नॅट सिव्हरने अजून एक धक्का देत गुजरातची अवस्था 3 बाद 37 धावा अशी केली. त्यानंतर लेग स्पिनर एमेलिया केरने विकेट्सचा धडाका लावत गुजरातच्या फलंदाजीला मोठं खिंडार पाडलं.

Amelia Kerr
Umpires Call Controversy : अंपायर कॉल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! तरीही का नाहीत बदलले जात नियम? जाणून घ्या कारण

एमेलिया केरने 4 षटकात 17 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. यात सेट झालेल्या गार्डनेर (15), तनुजा कनवर (28) यांचा देखील समावेश होता. मात्र गुजरातच्या ब्रेसने 24 चेंडूत नाबाद 25 धावा करत गुजरातने 126 धावांपर्यंत पोहचवलं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.