IND W vs AUS W: रेणुका ऑन फायर! एकाच ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला दिला दुहेरी धक्का, राधाचाही भन्नाट कॅच; पाहा Video

Women's T20I World Cup 2024: महिला टी२० वर्ल्ड कपमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाला रणुका सिंग ठाकूरने सुरुवातीलाच एकाच षटकात दोन मोठे धक्के दिले.
Renuka Singh Thakur | Women's T20 World Cup 2024
Renuka Singh Thakur | Women's T20 World Cup 2024Sakal
Updated on

Women T20 World Cup 2024 India vs Australia : महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात शारजाहमध्ये सामना होत आहे. या सामन्यात भारताची सुरुवात शानदार झाली आहे. रणुका सिंग ठाकूरने आपली लय कायम ठेवताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच दोन धक्के दिले.

ऑस्ट्रेलिया या सामन्यात नियमित कर्णधार एलिसा हेलीच्या अनुपस्थितीत ताहलिया मॅकग्राच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. मॅकग्राने सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाकडून ग्रेस हॅरिस आणि बेथ मुनी यांनी डावाची सुरुवात केली.

मुनीने बऱ्याचदा भारताविरुद्ध चांगला खेळ केला आहे. परंतु, या सामन्यात तिला धावा करण्यासाठी संघर्ष कराव लागत होता.

Renuka Singh Thakur | Women's T20 World Cup 2024
Women's T20 World Cup: भारताला सेमीफायनलला पोहोचण्यासाठी पार करावा लागणार ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या कसं आहे समीकरण

त्यातच तिसऱ्या षटकात रेणूकाने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर मुनीने शॉट खेळला, पण बॅकवर्ड पाँइंटला राधा यादवने जमिनीलगत शानदार झेल घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिला मोठा धक्का बसला.

त्यानंतर लगेचच तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या जॉर्जिया वेरहॅमला रेणुकाने पायचीत पकडले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सलग दोन चेंडूत दोन मोठे धक्के बसले. मात्र,यानंतर हॅरिससह मॅकग्राने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. या दोघींनी ऑस्ट्रेलियाला १० षटकात ६० धावांचा टप्पा पार करून दिला.

Renuka Singh Thakur | Women's T20 World Cup 2024
Women's T20 World Cup 2024: भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने कर्णधार बदलली, निर्णायक सामन्यासाठी असे आहेत 'प्लेइंग-११'

दरम्यान, या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये ग्रेस हॅरिस आणि डार्सी ब्राऊन यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. त्याचबरोबर भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला असून सजीवन सजनाच्या जागेवर पुजा वस्त्राकरला संधी दिली आहे.

प्लेइंग इलेव्हन

भारत - शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग

ऑस्ट्रेलिया - बेथ मूनी(यष्टीरक्षक), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, अॅश्ले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा(कर्णधार), जॉर्जिया व्हारेहम, ऍनाबेल सदरलँड, सोफी मोलिनेक्स, मेगन शट, डार्सी ब्राउन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.