Women's Asia Cup 2024: स्मृती मानधनाने अर्धशतक करत रचला विक्रम! फायनलमध्ये भारताचं श्रीलंकेला १६६ धावांचं आव्हान

India vs Sri Lanka Women: महिला आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने स्मृती मानधनाच्या अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेसमोर १६६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Smriti Mandhana
Smriti MandhanaX/BCCIWomen
Updated on

Women's Asia Cup 2024 Final India vs Sri Lanka: महिला आशिया कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंका संघात होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करतान २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या. भारताकडून स्मृती मानधनाने अर्धशतकी खेळी केली.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून शफाली वर्मा आणि मानधनाने चांगली सुरुवातही केली होती. मात्र शफालीला ७ व्या षटकात कविशा दिलहारीने १६ धावांवर बाद केले.

Smriti Mandhana
Women's Asia Cup 2024: श्रीलंकेच्या कर्णधारानं ६९ चेंडूत ११९ धावा करत रचला इतिहास, भारताच्या मिताली राजचा मोडला रेकॉर्ड

त्यानंतर उमा छेत्री (९) आणि कर्णधार हरमनप्रीत कौर (११) स्वस्तात बाद झाल्या. मात्र नंतर जेमिमा रोड्रिग्सने आक्रमक खेळत स्मृतीला साथ दिली. यादरम्यान स्मृतीने अर्धशतकही पूर्ण केले.

मात्र १७ व्या षटकात आधी जेमिमाहला २९ धावांवर धावबाद झाली आणि मग कविशाने मानधनाला ६० धावांवर बाद केले. मानधनाने ४७ चेंडूत ६० धावांची खेळी केली. या खेळीत तिने १० चौकार मारले.

अखेरीस ऋचा घोषने फटकेबाजी करत भारताला १६० धावांचा टप्पा पार करून दिला. तिने १४ चेंडूत ३० धावांची खेळी केली.

श्रीलंकेकडून कविशाने २ विकेट्स घेतल्या, तर उदेशिका प्रबोधनी, सचिनी निसांसाला आणि कर्णधार चमारी अट्टापट्टू यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

Smriti Mandhana
Women's Asia Cup: टीम इंडियाची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री! स्मृती मानधनाची अर्धशतकासह विक्रमाला गवसणी

मानधनाचा विक्रम

महिला टी२० आशिया कप स्पर्धेतील मानधनाचे हे तिसरे अर्धशतक आहे. त्यामुळे ती या स्पर्धेत तीन अर्धशतक करणारी मुर्शिदा खातून आणि मिताली राजनंतरची तिसरीच खेळाडू ठरली.

त्याचबरोबर महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही ती दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. तिने २६ वेळा ५० धावांचा टप्पा पार केला आहे.

या यादीत तिने बेथ मूनीला मागे टाकले. मूनीने २५ वेळा आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये ५० धावांचा टप्पा पार केला आहे. या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर सुझी बेट्स आहे. तिने २९ वेळा आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ५० धावांचा टप्पा पार केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.