Women's Asia Cup: टीम इंडियाची फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री! स्मृती मानधनाची अर्धशतकासह विक्रमाला गवसणी

India vs Bangladesh Women: महिला आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने नवव्यांदा फायनलमध्ये स्थान पटकावले आहे. याशिवाय स्मृती मानधनानेही मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
Smriti Mandhana - Shafali Verma
Smriti Mandhana - Shafali VermaSakal
Updated on

Women's Asia Cup 2024 Semi-Final, India vs Bangladesh: महिला आशिया कप 2024 स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने बांगलादेश महिला संघाविरुद्ध 10 विकेट्सने विजय मिळवला.

भारतीय संघासमोर विजयासाठी बांगलादेशने 81 धावांचे लक्ष्य ठेवले होते, या लक्ष्याचा पाठलाग भारताने अवघ्या 11 षटकात एकही विकेट न गमावता 83 धावा करत पूर्ण केला आणि विजय संपादन केला.

भारतीय संघ विक्रमी नवव्यांदा महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यात पोहचला आहे. तसेच आता रविवारी अंतिम सामन्यात आठव्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.

Smriti Mandhana - Shafali Verma
Women's Asia Cup 2024: भारतीय संघ सलग तिसऱ्या विजयासह सेमीफायनलमध्ये! पाकिस्तानलाही झाला मोठा फायदा

दरम्यान, भारताकडून 81 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उपकर्णधार स्मृती मानधनाने 39 चेंडूत 55 धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत 9 चौकार आणि 1 षटकार मारला. तसेच शफाली वर्माने 28 चेंडूत 26 धावांची खेळी करत तिला चांगली साथ दिली.

मानधनाने या अर्धशतकासह महिला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मेग लॅनिंग आणि हरमनप्रीत कौरला मागे टाकत दुसरा क्रमांक मिळवला आहे.

मानधनाच्या आता 140 आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये 3433 धावा झाल्या आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर न्यूझीलंडची सुझी बेट्स आहे. तिने 162 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 4348 धावा केल्या आहेत.

महिला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू

  • 4348 - सुझी बेट्स (162 सामने)

  • 3433 - स्मृती मानधना (140 सामने)

  • 3415 - हरमनप्रीत कौर (172 सामने)

  • 3405 - मेग लॅनिंग (132 सामने)

  • 3338 - स्टिफानी टेलर (121 सामने)

Smriti Mandhana - Shafali Verma
INDW vs BANW - Renuka Singh ची विक्रमी कामगिरी, भारतीय महिला बांगलादेशवर भारी

बांगलादेशच्या अवघ्या 80 धावा

उपांत्य सामन्यांत बांगलादेश महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बांगलादेशला 20 षटकात 8 बाद 80 धावाच करता आल्या. बांगलादेशकडून कर्णधार निगर सुलतानाने सर्वाधिक 32 धावा केल्या, तर शोरना अक्तरने 19 धावांनी नाबाद खेळी केली. या दोघींच्या व्यतिरिक्त कोणालाही दोनआकडी धावसंख्या गाठता आली नाही.

भारताकडून गोलंदाजी करताना रेणुका सिंग ठाकूर आणि राधा यादव यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच पुजा वस्त्राकर आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.