IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताच्या मानधना, दिप्ती, अन् हरमनप्रीतसाठी ठरला विक्रमी; जाणून काय केलेत पराक्रम

Women's Asia Cup 2024: महिला आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारताच्या स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रोड्रिग्स यांनी मोठे विक्रम केले आहेत.
Smriti Mandhana - Shafali Verma
Smriti Mandhana - Shafali VermaSakal
Updated on

Smriti Mandhana, Deepti Sharma, Harmanpreet Kaur records: महिला आशिया कप 2024 स्पर्धेत भारतीय संघाने शुक्रवारी (19 जुलै) पाकिस्तानविरुद्ध 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या दिप्ती शर्मा, जेमिमाह रोड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर यांनी मोठे विक्रम केले आहेत.

भारताचा आंतरराष्ट्रीय महिला टी20 क्रिकेटमधील हा 101 वा विजय ठरला आहे. तसेच या सामन्यात दिप्तीने ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यामुळे ती या सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूही ठरली. याशिवाय तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण केल्या.

असा कारनामा करणारी ती भारताची दुसरीच खेळाडू ठरली आहे. यापूर्वी झुलन गोस्वामी हिने 356 विकेट्स घेतल्या आहेत. तिने 5 कसोटीत 20 विकेट्स घेतल्या. तसेच 89 वनडेत 106 विकेट्स घेतल्या आहेत आणि 113 टी20 सामन्यांत 124 विकेट्स घेतल्या आहेत.

Smriti Mandhana - Shafali Verma
Women's Asia Cup 2024: भारताची विजयी सुरुवात! पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला केलं चारीमुंड्या चीत

सर्वाधिक धावा

या सामन्यात भारताकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक 45 धावा केल्या, तर शफाली वर्मा हिने 40 धावांची खेळी केली. याशिवाय जेमिमाह 3 धावांवर आणि कर्णधार हरमनप्रीत कौर 5 धावांवर नाबाद राहिली.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय महिला टी20 क्रिकेटमध्ये मानधाना आता सर्वाधिक धावा करणारी भारतीय ठरली आहे. तिने हरमनप्रीत कौरला मागे टाकले आहे. मानधनाच्या आता 137 टी20 सामन्यांत 3365 धावा झाल्या. तर हरमनप्रीतने 3349 धावा केल्या आहेत. इतकेच नाही, तर या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या जेमिमाहनेही शुक्रवारी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 2000 धावा पूर्ण केल्या.

आंतरराष्ट्रीय महिला टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटू

  • 3365 धावा - स्मृती मानधना (137 सामने)

  • 3349 धावा - हरमनप्रीत कौर (170 सामने)

  • 2364 धावा - मिताली राज (89 सामने)

  • 2000 धावा - जेमिमाह रोड्रिग्स (96 सामने)

  • 1788 धावा - शफाली वर्मा (77 सामने)

Smriti Mandhana - Shafali Verma
Suryakumar Yadav: 'मला मिळालेली नवी भूमिका...', भारताचा T20I कर्णधार झाल्यानंतर सूर्याची स्पेशल पोस्ट

हरमनप्रीतने मितालीला टाकले मागे

महिला टी20 आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत हरमनप्रीतने मिताली राजला मागे टाकले आहे. हरमनप्रीतच्या आता टी20 आशिया कप स्पर्धेत 18 सामन्यांत 404 धावा झाल्या आहेत. माजी क्रिकेटपटू मितालीने 10 सामन्यांत 402 धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मानधना असून तिने 351 धावा केल्या आहेत.

मानधना-शफालीची विक्रमी भागीदारी

दरम्यान, मानधना आणि शफाली यांनी 85 धावांची सलामी भागीदारी या सामन्यात केली. त्यामुळे त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भागीदारी करताना 4000 धावा पूर्ण केल्या आहेत.

महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भागीदारीत 4000 धावा करणारी त्यांची तिसरीच जोडी ठरली. यापूर्वी एलिसा हेली व बेथ मुनी आणि सुझी बेट्स व सोफी डिवाईन या दोन जोड्यांनी यापूर्वी असा विक्रम केला आहे.

भारताचा पाकिस्तानविरुद्ध विजय

शुक्रवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने 19.2 षटकात सर्वबाद 108 धावा केल्या होत्या. त्यानंतर 109 धावांचे आव्हान भारताने 14.1 षटकात 3 विकेट्स गमावत पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.