Women's Asia Cup 2024: टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली, अवघ्या 108 धावांवर ऑलआऊट

India vs Pakistan Women: महिला आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी 109 धावांचे आव्हान ठेवले आहे.
India Women Team
India Women TeamX/BCCIWomen
Updated on

Women's Asia Cup 2024, India vs Pakistan: महिला आशिया कप 2024 स्पर्धेतील दुसरा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात होत आहे. शुक्रवारी डंबुला येथे होत असलेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर 109 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तान संघ 19.2 षटकात अवघ्या 108 धावांवर सर्वबाद झाला.

India Women Team
Women's Asia Cup 2024: भारताविरूद्ध पाकिस्तानने जिंकला टॉस! हरमनप्रीतने सांगितलं प्लेइंग-11 मध्ये झाले तीन बदल

पाकिस्तानकडून गुल फिरोझा (5) आणि मुनीबा अली (11) या सलामीला फलंदाजीला उतरल्या होत्या. मात्र पुजा वस्त्राकरने तिच्या पहिल्या दोन षटकातच या दोघींनाही माघारी धाडले. यानंतर मात्र पाकिस्तान संघाला सावरता आले नाही आणि त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमवायला सुरुवात केली.

सलामी जोडी लवकर बाद झाल्यानंतर एक बाजू सिद्रा अमीनने सांभाळली होती. पण तिला साथ देण्यासाठी आलेल्या अलिया रियाझ (6) आणि कर्णधार निदा दार (8) यांनी स्वस्तात विकेट्स गमावल्या.

त्यानंतर 13 व्या षटकात रेणुका सिंग ठाकूरने पाकिस्तानला दुहेरी दणके दिले. तिने आधी सिद्राला 25 धावांवर बाद केले, त्याच्या पुढच्याच चेंडूवर इराम जावेदला शुन्यावर पायचीत केले.

India Women Team
Women's Asia Cup 2024: भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने! आशिया कपच्या शेड्युलची झाली घोषणा

यानंतर तौबा हसन आणि फातिमा सना यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पम तौबाला १८ व्या षटकात दिप्ती शर्माने 22 धावांवर बाद केले. याच षटताच सईदा आरुब शाह 2 धावांवर धावबाद झाली. याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर नाशरा संधूलाही दिप्तीने शुन्यावरच माघारी धाडले.

अखेरच्या षटकातच्या दुसऱ्या चेंडूवर श्रेयंका पाटीलने सादिया इक्बालला त्रिफळाचीत करत पाकिस्तानचा डाव संपवला. अखेरीस फातिमा सना 16 चेंडूत 22 धावा करून नाबाद राहिली.

भारताकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच पुजा वस्त्राकर, रेणुका सिंग ठाकुर आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.