Women T20 World Cup 2024 :रविवारी महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात शारजाहमध्ये सामना सुरू आहे. सेमीफायनमधील प्रवेशासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १५२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १५१ धावा केल्या.
महिला टी२० वर्ल्ड कप स्पर्धेत शारजाहच्या क्रिकेट स्टेडियममध्ये पहिल्यांदाच १५० धावांचा टप्पा पार झाला आहे. त्यामुळे भारताला विजय मिळवण्यासाठी विक्रमी धावांचा पाठलाग करावा लागणार आहे.
या सामन्याला ऑस्ट्रेलियाची नियमित कर्णधार एलिसा हेली मुकली आहे. तिच्या अनुपस्थितीत ताहलिया मॅकग्रा ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तिने या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रण दिले.
भारताला रेणुका सिंग ठाकूरने शानदार सुरुवातही करून दिली. ऑस्ट्रेलियाकडून ग्रेस हॅरिस आणि बेथ मुनी यांनी सावध सुरुवात केली होती. पण तिसऱ्या षटकात अनुभवी बेथ मुनीला रणुका सिंगने राधा यादवच्या हातून २ धावांवरच बाद केले.
त्याच्या पुढेच्याच चेंडूवर जॉर्जिया वेरहॅमला शुन्यावर रेणुकाने पायचीत केले. पण नंतर ग्रेस हॅरिससह ताहलिया मॅकग्राने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.
या दोघींनी ऑस्ट्रेलियाला १० षटकात ६० धावांचा टप्पा पार करून दिला. त्यांनी चांगली भागीदारी केली होती. अखेर त्यांची ६२ धावांची भागीदारी १२ व्या षटकात राधा यादवने तोडली. तिने मॅकग्राला ३२ धावांवर बाद केले. पाठोपाठ हॅरिसलाही १४ व्या षटकात ४० धावांवर दिप्ती शर्माने स्मृती मानधनाच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या डावाला लगाम लागला.
मात्र नंतर आलेल्या एलिस पेरीने आक्रमक २३ चेंडूत ३२ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलिया चांगली धावसंख्येपर्यंत पोहचेल याची काळजी घेतली. तिला १९ व्या षटकात दिप्ती शर्माने बाद केले. तिच्याआधी ऍश्ले गार्डनर ६ धावांवर स्वस्तात बाद झाली होती.
अखेरच्या षटकात ऍनाबेल सदरलँड (१०) आणि सोफी मोलिनेक्स (०) या दोघीही बाद झाल्या. मात्र शेवटच्या चेंडूवर फोबी लिचफिल्डने षटकार खेचत ऑस्ट्रेलियाला १५० पार पोहचवले. ती १५ धावांवर नाबाद राहिली.
भारताकडून रेणुका सिंग ठाकूर आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच श्रेयंका पाटील, पुजा वस्त्राकर आणि राधा यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.