SA vs NZ WT20 World Cup Final : पहिल्यांदाच विश्वविजय मिळवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडविरुद्ध पार करावा लागणार १५९ धावांचा डोंगर

SA vs NZ Womens T20 World Cup Final : न्यूझीलंडनने महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या अंतीम सामन्यात प्रथम फलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला १५९ धावांचे आव्हान दिले आहे.
rinku singh singh
rinku singh singhesakal
Updated on

Womens T20 World Cup Final SA vs NZ: दुबईमध्ये आज दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडन दरम्यान महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा अंतिम सामना दुबईमध्ये रंगला आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडने दमदार फलंदाजी करत २० षटकांच्या समाप्तीनंतर ५ विकेट गमावत १५८ धावा धावफलकावर लावल्या. ज्यामध्ये अमेलिया केर व ब्रुक हॅलिडेच्या ५७ धावांच्या भागिदारीचे महत्वाचे योगदान आहे. दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड कप आपल्या नावे करण्यासाठी १५९ धावांची गरज आहे.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या न्युझीलंडने आपला पहिला विकेट १६ धावांवर गमावला. जॉर्जिया प्लिमरच्या रुपाने (९) न्युझीलंडला पहिला धक्का मिळाला. त्यानंतर फलंदाजीमध्ये लय पकडलेल्या सुझी बेट्सला नॉनकुलुलेको म्लाबाने ३२ धावांवर बाद केले. त्यामागोमाग कर्णधार सोफी डिव्हाइन अवघ्या ६ धावा करून परतली. त्यानंतर अमेलिया केर व ब्रुक हॅलिडेच्या जोडीने गती पकडली. १५ व्या षटकात १०० धावा पूर्ण झाल्या. क्लर्कने १५व्या षटकाचा पाचवा चेंडू नो टाकला आणि पुढील फ्री हीटच्या चेंडूवर केरने चौकार ओढला. त्यामुळे न्युझीलंडच्या फलंदाजांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांच्या मंदावलेल्या डावाला गती मिळाली.

rinku singh singh
न्यूझीलंड की दक्षिण आफ्रिका, Women's T20 World Cup मध्ये आज नवा विजेता ठरणार! कुठे आणि कशी पाहाणार मॅच, घ्या जाणून

जलद धावसंख्या बनवायाच्या नादात हॅलिडेने मोठा फटका खेळला आणि अनेके बॉशने सीमारेषेवर अचूक झेल पकडला. त्यामुळे हॅलिडेला ३८ धावांवर परतावे लागले. केर व हॅलिडेच्या जोडीने ५७ धावांची भागीदारी केली. हॅलिडे परतल्यावर केरने फटकेबाजी सुरूच ठेवली. करने १९ व्या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर सलग चौकार ठोकले. पण ४चौथ्या चेंडूवर तिलाही झेलबाद होवून परतावे लागले. न्यूझीलंडनने २० षटकांअंती १५८ धावा उभारल्या आणि दक्षिण आफ्रिकेला १५९ धावांचे आव्हान दिले.

न्यूझीलंडन प्लेइंग इलेव्हन

सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, सोफी डिव्हाइन (कर्णधार), अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेझ, रोजमेरी मेयर, ली ताहूहू, एडेन कार्सन, फ्रांस जोन्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.