न्यूझीलंड की दक्षिण आफ्रिका, Women's T20 World Cup मध्ये आज नवा विजेता ठरणार! कुठे आणि कशी पाहाणार मॅच, घ्या जाणून

Women's T20 World Cup 2024 Final New Zealand vs South Africa: महिला ट्वेन्टी-२० विश्वकरंडक अंतिम सामना रविवारी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघात रंगणार आहे.
Women's T20 World Cup 2024 Final New Zealand vs South Africa
Women's T20 World Cup 2024 Final New Zealand vs South AfricaSakal
Updated on

Women's T20 World Cup Final: महिला ट्वेन्टी-२० विश्वकरंडक अंतिम सामन्यात फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज (२० ऑक्टोबर) होणार आहे. सहा वेळचे विश्वविजेते ऑस्ट्रेलिया आणि त्यांच्यानंतर इंग्लंडही उपांत्य फेरीत गारद झाल्यामुळे यंदा नवा विश्वविजेता संघ मिळणार हे निश्चित झाले आहे.

न्यूझीलंड संघाने २००० मध्ये महिला एकदिवसीय विश्वकरंडक जिंकला होता; परंतु त्या संघातील एकही महिला खेळाडू या ट्वेन्टी-२० संघात नाही.

या स्पर्धेत उतरण्यापूर्वी सोफी डेव्हिनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंड संघाने या ट्वेन्टी-२० प्रकारात सलग १० सामने गमावले होते; पण या विश्वकरंडक स्पर्धेत डेव्हिनसह सुझी बेटस् अमेलिया केर यांनी फारच चांगली कामगिरी करून संघाचे भवितव्य उंचावले आहे.

Women's T20 World Cup 2024 Final New Zealand vs South Africa
T20 World Cup 2024 : भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात; पाकिस्तानने विश्वासाला तडा दिला, आपला संघ बाहेर गेला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.