Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागती; नक्की काय झालं?

Women's T20 World Cup 2024 India vs New Zealand: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात नाट्यपूर्ण घटना घडली. एमेलिया केरला रनआऊट केल्यानंतरही अंपायरकडून नॉटआऊट देण्यात आले. यामागे कारण काय आहे जाणून घ्या.
India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024
India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024Sakal
Updated on

Women's T20 World Cup 2024, India vs New Zealand: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळत आहे. दुबईत होत असलेल्या या सामन्यात एक नाट्यपूर्ण घटना घडली. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम गोलंदाजीसाठी उतरला.

यावेळी, न्यूझीलंडकडून तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेली एमेलिया केर धावा करण्यासाठी संघर्ष करताना दिसत होती. त्यातच तिला १४ व्या षटकात बाद करण्याची संधीही भारताकडे होती. मात्र, तिला एका नियमामुळे जीवदान मिळाले.

झालं असं की १४ व्या षटकात दिप्ती शर्मा गोलंदाजी करत होती. तिने टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर केरने लाँग ऑफला शॉट खेळला आणि ती कर्णधार सोफी डिवाईनसह एक धाव धावली. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या धावेसाठीही प्रयत्न केला. त्यावेळी हरमनप्रीत कौरने लाँग-ऑफवरून यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू फेकला.

India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024
Women's T20 World Cup: भारतीय खेळाडूंना पहिल्या सामन्यापूर्वी कुटुंबियांकडून खास भेट, BCCI ने शेअर केला Video

यावेळी भारताने लगेचच तिला धावबाद केले. केरलाही वाटलं ती बाद आहे, त्यामुळे ती परत जाण्यास निघाली. भारतानेही आनंद साजरा केला. परंतु, ती परत जात असताना पंचांनी तिला परत बोलावून घेतलं. कारण ती धावबाद होण्यापूर्वीच चेंडू पूर्ण झाल्याचे पंचांनी घोषित केले असल्याचे सांगत तिला नाबाद घोषित केले.

ज्यावेळी चेंडू पूर्ण होतो (डेड होतो), त्यावेळी फलंदाज बादही होऊ शकत नाही आणि धावाही काढू शकत नाही. या नियमाने पंचांच्या म्हणण्यानुसार भारताकडून बादचे अपील होण्यापूर्वीच चेंडू डेड झालेला होता. त्यामुळे केर नाबाद राहिली.

मात्र, या निर्णयावर भारताची कर्णधार हरमनप्रीत आणि मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार निराश दिसले. मुजुमदार बाऊंड्रीबाहेर फोर्थ अंपायरशी चर्चाही करताना दिसले. त्यांच्याबरोबर नंतर हरमनप्रीतही चर्चा करताना दिसली. यामुळे काही मिनिटे सामनाही थांबला होता. पण नंतर पुन्हा पंचांनी सामना पुढे चालू ठेवण्यास सांगितले.

India vs New Zealand | ICC Women's T20 World Cup 2024
Women's T20 World Cup: न्यूझीलंडची कर्णधार लढली; भारताविरुद्ध अर्धशतक ठोकत संघाला नेलं दीडशे पार

दरम्यान, केर या जीवदानाचा फायदा घेऊ शकली नाही. तिला १५ व्या षटकात रेणुका सिंग ठाकूरने पुजा वस्त्राकरच्या हातून झेलबाद केले. केरने २२ चेंडूत १३ धावा केल्या. पण नंतर डिवाईनने केलेल्या आक्रमक अर्धशतकामुळे न्यूझीलंडने २० षटकात ४ बाद १६० धावा केल्या.

डिवाईनने ३६ चेंडूत ५७ धावांची नाबाद खेळी केली. तसेच न्यूझीलंडकडून सुझी बेट्सने २७ आणि जॉर्जिया प्लिमरने ३४ धावांची खेळी केली.

भारताकडून रेणुका सिंगने २ विकेट्स घेतल्या, तसेच अरुंधती रेड्डी आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी १ विकेट घेता आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.