Women's T20 World Cup विजेत्या न्यूझीलंडला १९ कोटी, तर भारत ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडूनही मिळाले करोडो रुपये

Women's T20 World Cup 2024 Prize Money: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत जिंकले. यानंतर आयसीसीकडून या दोन्ही संघांना मोठे बक्षीस मिळाले. याशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर ८ संघांनाही कोट्यवधींची बक्षीसं मिळाली.
Women's T20 World Cup 2024 Prize Money
Women's T20 World Cup 2024 Prize MoneySakal
Updated on

Women's T20 World Cup 2024 Prize Money: महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचे विजेतेपद न्यूझीलंड संघाने जिंकले. दुबईत रविवारी (२० ऑक्टोबर) झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिका संघाला ३२ धावांनी पराभूत करत पहिल्यांदाच महिला टी२० वर्ल्ड कपवर नाव कोरले.

न्यूझीलंड महिला टी२० वर्ल्ड कप जिंकणारा चौथा संघ ठरला. या सामन्यानंतर न्यूझीलंड संघाला मोठी बक्षीस रक्कम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) देण्यात आले. केवळ न्यूझीलंडलाच नाही, तर स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक संघाला आयसीसीने बक्षीस दिले आहे.

दरम्यान, यंदा आयसीसीने महिला आणि पुरुष संघाला समान बक्षीस देण्याच्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आयसीसीने महिला टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेच्या बक्षीस रक्कमेत मोठी वाढ केली.

Women's T20 World Cup 2024 Prize Money
T20 World Cup 2024 Prize Money : विजेत्या टीम इंडियासह सर्व 20 संघ मालामाल; जाणून घ्या कोणाला किती मिळाली बक्षीस रक्कम
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.