महिला ट्वेन्टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये दोन नवे संघ! मिळणार New Champion

NZ vs WI Womens World Cup Semifinal: न्यूझीलंडने वेस्ट इंडिजविरुद्धचा सेमिफायनलचा सामना जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलचा सामना न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान होईल.
Womens T20 World Cup
Womens T20 World CupEsakal
Updated on

NZ vs WI Womens World Cup Semifinal: महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरी गाठली. आज झलेल्या न्यूझीलंडविरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात न्यूझीलंडने अवघ्या ८ धावांनी बाजी मारली व अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. आता विजेतेपदासाठी २० ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड संघ आमने सामाने येतील. त्यामुळे यावर्षीचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेतेपद एका नव्या संघाकडे जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.