Spain World Record: स्पेनच्या ट्वेंटी-२० क्रिकेट संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड, मोडला टीम इंडियाचा विक्रम!

Spain T20I record : फुटबॉल आणि टेनिस वर्तुळात स्पेन हे खूप मोठं नाव आहे. स्पेनने फुटबॉल वर्ल्ड कप जिंकले आहेत, तर त्यांचा टेनिस स्टार राफेल नदाल हा जगभरातील हिट आहे. पण, क्रिकेटमध्येही त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे.
World Record Spain
World Record Spain esakal
Updated on

Spain cricket team breaks India's record:

स्पेनच्या क्रिकेट संघाने सोमवारी वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली आहे. युरोपियन देशाने पोर्ट सौफ येथील ग्वेर्नसे रोव्हर्स ऍथलेटिक क्लब ग्राउंडवर आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ उप-प्रादेशिक पात्रता गट सी सामन्यात ग्रीस संघावर ७ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह स्पेनने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सलग १४ सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे.

स्पॅनिश संघाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त सलग सर्वाधिक १४ ट्वेंटी-२० सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. ख्रिश्चन मिल्सच्या नेतृत्वाखालील संघाने फेब्रुवारी २०२३ मध्ये विजयाला सुरुवात केली आणि त्यांनी आयल ऑफ मॅनविरुद्ध सलग चार सामने जिंकले. क्रोएशियाविरुद्ध सलग चार सामने जिंकले आणि सलग दोन सामन्यांत जर्सीचा पराभव केला. स्पेनने गेल्या आठवड्यात सायप्रस, झेक प्रजासत्ताक आणि ग्रीसचा पराभव केला आहे.

World Record Spain
India's Schedule T20 WC 2024: भारत-पाकिस्तान महामुकाबला ६ ऑक्टोबरला; टीम इंडियाचं वेळापत्रक आलं समोर

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम यापूर्वी मलेशिया ( २०२२ ) आणि बर्मुडा ( २०२१-२३) यांच्या नावावर होता. त्यांनी सलग १३ सामने जिंकले होते. कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रांमध्ये, भारत आणि अफगाणिस्तानने इतिहासात सलग १२ सर्वाधिक ट्वेंटी-२० सामने सामने जिंकले आहेत. भारताने २०२१-२२ मध्ये ही कामगिरी केली होती.

अफगाणिस्तानने फेब्रुवारी २०१८ पासून पुढील १८ महिन्यांत १२ सामने जिंकले होते. रोमानियाने २०२०-२१ मध्ये १२ सामने जिंकण्याची नोंद केली होती. स्पेनचे मुख्य प्रशिक्षक कोरी रटगर्स म्हणाले, “आज आम्ही एक अभिमानास्पद विक्रम नोंदवला आहे. आम्ही रेकॉर्डसाठी खेळत नाही, परंतु हे आमच्या संघासाठी खास आहे. स्पेनमध्ये ही काही वर्षे बदल घडवून आणणारी आहे, आणि बरेच श्रेय त्या खेळाडूंना जाते.”

स्पेनने सोमवारी झालेल्या सामन्यात ग्रीसवर ७ विकेट्सने विजय मिळवला. ग्रीसला ९ बाद ९६ धावा करता आल्या होत्या आणि स्पेनने १३ षटकांत हे लक्ष्य पार केले. या सामन्यात ख्रिश्चन मिल्सने आणखी एक वैयक्तिक विक्रम नावावर केला. स्पेनकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक २६ झेल घेण्याचा विक्रम त्याने नावावर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.