WTC 2023-25 Points Table: श्रीलंकेचा १५ वर्षांचा दुष्काळ संपवत न्यूझीलंडला व्हाईटवॉशचा धक्का अन् वाढलं भारत-ऑस्ट्रेलियाचं टेन्शन

WTC 2023-25 Points Table After Sri Lanka vs New Zealand Test Series: श्रीलंका क्रिकेट संघाने न्यूझीलंडला कसोटी मालिकेत व्हाईटवॉश दिला आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचाही भाग असल्याने पाँइंट्स टेबलमध्येही बदल झाले आहेत.
Sri Lanka Cricket
Sri Lanka CricketSakal
Updated on

World Test Championship 2023-25 latest update: श्रीलंका क्रिकेट संघाने रविवारी मोठा पराक्रम केला. श्रीलंकेने रविवारी न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि आणि १५४ धावांनी विजय मिळवला.

याआधी श्रीलंकेने पहिल्या कसोटी सामन्यात ५३ धावांनी विडय मिळवला होता. त्यामुळे श्रीलंकेने ही मालिका २-० अशा फरकाने जिंकत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला.

श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका तब्बल १५ वर्षांनंतर जिंकली आहे. यापूर्वी २००९ मध्ये श्रीलंकेने न्यूझीलंडला कसोटी मालिकेत मात दिली होती.

दरम्यान, श्रीलंका आणि न्यूझीलंड संघात झालेली ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचा भाग होती. त्यामुळे या मालिकेच्या निकालाचा परिणाम टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या पाँइंट्स टेबलवरही झाला आहे.

Sri Lanka Cricket
Ajinkya Rahane चा विक्रम संकटात: WTC मध्ये भारतीय फलंदाजांची कामगिरी जोरात

श्रीलंकने या विक्रमी विजयासह पाँइंट्स टेबलमधील आपले तिसरे स्थान आणखी भक्कम केले आहे. श्रीलंकेला अद्याप पहिल्या दोन क्रमांकावर जाता आले नसले तरी त्यांनी तिसऱ्या क्रमांक आणखी भक्कम केला आहे.

सध्या श्रीलंकेने ९ सामने खेळताना ५ विजय मिळवले आहे, तर ४ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांची सरासरी टक्केवारी ५५.५६ अशी झाली आहे. सध्या अव्वल दोन क्रमांकावर अनुक्रमे भारत आणि ऑस्ट्रेलिया कायम आहेत.

भारतीय संघाने आत्तापर्यंत या स्पर्धेत १० सामने खेळताना ७ विजय मिळव असून भारताच्या विजयाची सरासरी टक्केवारी ७१.६७ आहे. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया असून त्यांनी १२ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले आहेत. त्यांची सरासरीने टक्केवारी ६२.५० अशी आहे.

मात्र, या पराभवाचा न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. न्यूझीलंडने आत्तापर्यंत ८ सामने खेळले असून ३ सामन्यांत विजय मिळवलाय, तर ६ सामन्यांत पराभव स्विकारला आहे. त्यामुळे न्यूझीलंडची टक्केवारी ३७.५० वर घसरली आहे.

Sri Lanka Cricket
Pakistan Cricket: पाकिस्तानला क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का! WTC मधील मालिका तोंडावर असताना मीडिया हक्कच कोणी खरेदी करेना

न्यूझीलंडच्या पुढे आता चौथ्या क्रमांकावर इंग्लंड असून त्यांची ४२.१९ सरासरी टक्केवारी आहे. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर ३९.२९ सरासरी टक्केवारीसह बांग्लादेश आहे. सहाव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेची ३८.८९ टक्केवारी आहे.

पाँइंट्स टेबलमध्ये सध्या आठव्या क्रमांकावर पाकिस्तान असून त्यांची १९.०५ टक्केवारी आहे, तर नवव्या क्रमांकावर वेस्ट इंडिज आहे, ज्यांची विजयी टक्केवारी १८.५२ आहे.

श्रीलंकेचा विजय

दरम्यान, श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पहिला डाव १६३.४ षटकात ५ बाद ६०२ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर न्यूझीलंड संघ पहिल्या डावात ३९.५ षटकात अवघ्या ८८ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे श्रीलंकेला ५१४ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांनी न्यूझीलंडला फॉलोऑन दिला.

फॉलोऑननंतर न्यूझीलंडने तुलनेने चांगली फलंदाजी केली, मात्र तरी त्यांचा दुसरा डाव ८१.४ षटकात ३६० धावांवर संपुष्टात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.