WTC 2025: पाकिस्तान शर्यतीतून बाद झाला अन् ICC ने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेबाबत केली मोठी घोषणा

WTC FINAL 2025 : बांगलादेशकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
WTC 2025 Final venue
WTC 2025 Final venueesakal
Updated on

WTC FINAL 2025 : बांगलादेशकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. भारतीय संघ WTC Point Table मध्ये आघाडीवर आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. त्यामुळे फायनलच्या शर्यतीत हेच दोन संघ सध्या आघाडीवर आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनलची तारीख आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने ( ICC) मंगळवारी जाहीर केली आहे. ११ ते १५ जून २०२५ या कालावधीत लॉर्ड्स मैदानावर ही फायनल खेळवली जाणार आहे. या कसोटीसाठी १६ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल लॉर्ड्सवर खेळवण्याची ही पहिलीच वेळ असेल. २०२१ आणि २०२३ मधील स्पर्धेची फायनल ओव्हलवर झाल्या होत्या आणि भारतीय संघाला हार पत्करावी लागली होती. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने तेव्हा स्पर्धा जिंकली होती. सध्याच्या WTC मध्ये रोहित शर्माचा भारत अव्वल स्थानावर आहे आणि पाठोपाठ गतविजेता ऑस्ट्रेलियन संघ आहे.

न्यूझीलंड (तिसरा), इंग्लंड (चौथा), श्रीलंका (पाचवा), दक्षिण आफ्रिका (सहावा) आणि बांगलादेश (सातवा) असा क्रम नंतर येतो. आयसीसीचे सीईओ जेफ ॲलार्डिस यांनी सांगितले की, "आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल ही क्रिकेट कॅलेंडरमधील सर्वात चुरशीची बनली आहे आणि आम्हाला २०२५ आवृत्तीच्या तारखा जाहीर करताना आनंद होत आहे."

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.