WPL 2024 Mumbai Indians vs Delhi Capitals : वुमन प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचा थरार शुक्रवार 23 फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. गेल्या हंगामातील अंतिम फेरीतील दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पहिल्या सामना खेळला गेला.
ज्यामध्ये मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम खेळताना दिल्ली कॅपिटल्स संघाने 20 षटकात 5 गडी गमावून 171 धावा केल्या. पण शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात संजीवन संजनाच्या षटकाराच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा चार गडी राखून पराभव केला.
172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि पहिल्याच षटकात मुंबईने हेली मॅथ्यूजची विकेट गमावली. यानंतर दुसऱ्या विकेटसाठी ब्रंट आणि यस्तिका यांच्यात जवळपास 50 धावांची भागीदारी झाली. ब्रंट 17 चेंडूत 19 धावा करून आऊट झाली. तर यास्तिका भाटियाने 45 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी केली.
मुंबईला शेवटच्या षटकात 12 धावांची गरज होती. पण षटकाच्या पहिल्याच चेंडूवर वस्त्राकर पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर पुढच्या तीन चेंडूत सात धावा आला. पण पाचव्या चेंडूवर कर्णधार हरमनप्रीत कौरही आऊट झाली. तिने 34 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 55 धावा केल्या.
शेवटच्या चेंडूवर पाच धावा हव्या होत्या. पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या संजनाने षटकार ठोकत मुंबईला रोमहर्षक विजय मिळवून दिला. दिल्ली कॅपिटल्सकडून अरुंधती रेड्डी आणि ॲलिस कॅप्सीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. शिखा पांडे आणि मारिजन कॅपने प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्याआधी, नाणेफेक हरल्यानंतर मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स संघाने लीगच्या पहिल्या सामन्यात पाच गडी गमावून 171 धावा केल्या. संघाला पहिला धक्का शेफाली वर्माच्या रूपाने बसला. ती एक धाव काढून बाद झाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या ॲलिस कॅप्सीने 75 धावांची शानदार खेळी केली. या दरम्यान तिने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारले.
कॅप्टन लॅनिंगने 31 धावा, जेमिमाह रॉड्रिग्जने 42 धावा आणि मारिझान कॅपने 16 धावा केल्या. ॲनाबेल सदरलँड एक धाव घेत नाबाद राहिली. मुंबईकडून नताली सिव्हर ब्रंट आणि अमेलिया केरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. याशिवाय शबनिम इस्माईलला यश मिळाले.
उद्घाटन सोहळ्यात ग्लॅमरचा तडका
या सामन्यापूर्वी महिला प्रीमियर लीगच्या या हंगामाची रंगतदार सुरुवात झाली. या सोहळ्यात शाहरुख खान, शाहिद कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन आणि टायगर श्रॉफ परफॉर्म करताना दिसले. शेवटी शाहरुख खान सर्व संघाच्या कर्णधारांशी बोलताना दिसला. नंतर सर्व महिला कर्णधारांनी शाहरुखसोबत फोटोशूट करून घेतले आणि त्याची सिग्नेचर पोजही दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.