Gujarat Giants vs Mumbai Indians : महिला प्रीमियर लीग 2024 चा मुंबई इंडियन्सने दुसरा सामनाही जिंकला आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला होता, आता एमआयने गुजरात टायटन्सचा 5 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत आपले पहिले स्थान आणखी मजबूत केले आहे.
मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने चाहते आले होते. मात्र मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना स्टेडियममध्ये त्यांच्या संघाचा झेंडा फडकावण्यास मनाई करण्यात आली, ज्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आता व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सच्या एका चाहत्याने त्याच्या एक्स हँडल (पूर्वीचे ट्विटर) वर व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये तो लिहिले की, स्टेडियमचे स्वयंसेवक मुंबई संघाचा झेंडा फडकवल्याबद्दल आम्हाला धमकावत आहे.
त्याच ट्विटमध्ये स्टेडियमच्या स्वयंसेवकाचा व्हिडिओ शेअर केला होता जिथे तो म्हणत आहे की, “तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. पण आज हे स्टेडियम गुजरात जायंट्ससाठी होम ग्राउंड आहे आणि त्यामुळे तुम्ही हा मुंबई इंडियन्सचा झेंडा फडकू शकत नाही. आणखी एका चाहत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये स्टेडियम स्वयंसेवक मुंबई इंडियन्सचे झेंडे काढून घेत आहे.
सामन्याबद्दल बोलयचे झाले तर, कर्णधार हरमनप्रीत कौरने आज पुन्हा एकदा मुंबईसाठी कर्णधारपदाची खेळी खेळली आहे. त्याने 41 चेंडूत 46 धावांची खेळी केली आहे. याशिवाय अमेलिया केरनेही कर्णधाराला चांगली साथ दिली. त्याने 25 चेंडूत 31 धावांची खेळी खेळली आहे. या दोन खेळाडूंच्या शानदार फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने सामना सहज जिंकला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.