Royal Challengers Bangalore Champions WPL 2024 : इंडियन प्रीमियर लीगची सुरूवात 2008 मध्ये झाली होती. तेव्हापासुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रँचायझीला एकदा पण ट्रॉफी जिंकता आली नाही. 16 वर्षांच्या इतिहासात या संघाचे नेतृत्व विराट कोहलीसह अनेक जगभरातील दिग्गजांनी केले आहे, पण त्यांचे स्वप्न अधुरे राहिले.
पण यावेळी महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीचा ट्रॉफीचा दुष्काळ संपला आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली बंगळुरूने पहिल्यांदाच कोणती तरी ट्रॉफी जिंकली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने रविवारी महिला प्रीमियर लीग (WPL) च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 18.3 षटकात 113 धावा केल्या. आरसीबीने 19.3 षटकांत दोन गडी गमावून सहज लक्ष्य गाठले. आरसीबीचे हे पहिले विजेतेपद आहे.
बंगळुरूच्या पुरुष संघाने कधीही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही, परंतु महिला संघाने डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात विजय मिळवला. लक्ष्याचा पाठलाग करताना सोफी डिव्हाईन आणि स्मृती मानधना यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली, आणि दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 49 धावा जोडल्या. शिखा पांडेने 32 धावा करणाऱ्या डिव्हाईनला बाद करून ही भागीदारी मोडली. यानंतर कर्णधार मानधनाने डावाची धुरा सांभाळली, मात्र मिन्नू मणीने तिला 31 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर एलिस पेरी आणि रिचा घोष यांनी अखेरच्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली संघाला शेफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी आक्रमक खेळ करत आरसीबीच्या गोलंदाजांवर दडपण आणले. आणि पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली.
मात्र आठवे षटक टाकण्यासाठी आलेला डावखुरा फिरकी गोलंदाज मोलिनक्सने या षटकात शेफाली, कॅप्सी आणि जेमिमाला बाद करून दिल्लीचे कंबरडे. यानंतर श्रेयंका पाटीलचा कहर पाहिला मिळाला. सलामीवीर शेफाली वर्माचे अर्धशतक हुकले. आक्रमक फलंदाजी करताना त्याने 27 चेंडूत 44 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले.
त्यानंतर11व्या षटकात श्रेयंकाने कर्णधार लॅनिंगला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तिला 23 चेंडूंत तीन चौकारांसह 23 धावा करता आल्या. राधा यादव (12) 17व्या षटकात धावबाद झाली. मॅरिझान कॅप (8), जेस जोनासेन (3), मिन्नू मणी (5) आणि यष्टिरक्षक तानिया भाटिया (0) यांनाही मोठी खेळी खेळता आली नाही. अरुंधती रेड्डी (10) आणि भाटिया यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद करत श्रेयंकाने 19व्या षटकात दिल्लीचा डाव गुंडाळला.
दिल्लीची फलंदाजी इतकी खराब झाली होती की, एकेकाळी बिनबाद 64 धावा करणारा संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही आणि 113 धावांवर ऑलआऊट झाला.
आरसीबीकडून श्रेयंका पाटीलने चार, मोलिनक्सने तीन आणि आशाने दोन गडी बाद केले. विशेष म्हणजे आरसीबीच्या फिरकीपटूंनी नऊ विकेट्स घेतल्या होत्या तर राधा यादव धावबाद झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.