WTC 2023-25 Points Table: भारताविरूद्धच्या पराभवानंतर बांगलादेशची घसरगुंडी, तर रोहितसेना कोणत्या क्रमांकावर?

WTC Points Table After India vs Bangladesh 1st Test: भारतीय क्रिकेट संघाने रविवारी बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत २८० धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाँइंट्स टेबलमध्येही बदल झाले आहेत.
Team India
Team IndiaSakal
Updated on

World Test Championship 2023-25 latest update: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (२२ सप्टेंबर) बांगलादेशविरुद्ध चेन्नईला झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात २८० धावांनी विजय मिळवला. यासह भारताने २ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचाही भाग आहे. त्यामुळे चेन्नई कसोटीनंतर टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाँइंट्स टेबलमध्येही बदल झाले आहेत.

या विजयामुळे भारतीय संघाने पाँइंट्स टेबलमधील आपले पहिले स्थान आणखी भक्कम केले आहे. भारताने १० सामन्यांमधील ७ विजयांसह ८६ गुण मिळवले आहे. तसेच भारताच्या विजयाची सरासरी टक्केवारी ७१.६७ आहे.

भारतापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने १२ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले असून त्यांचे ९० गुण आहेत. पण विजयाची सरासरी टक्केवारी त्यांची भारतापेक्षा कमी असल्याने तो दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाची सरासरीने टक्केवारी ६२.५० अशी आहे.

Team India
IND vs BAN 1st Test: भारताने चौथ्याच दिवशी बांगलादेशला केलं पराभूत! शतक अन् ५ विकेट्स घेणारा अश्विन विजयाचा शिल्पकार

मात्र बांगलादेशला भारताविरूद्धच्या पराभवाचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे. बांगलादेशला चौथ्या स्थानावरून आता ६ व्या स्थानावर घसरावे लागले आहे. त्यांनी ७ पैकी ३ सामने जिंकले आहेत. त्यांची विजयाची सरासरी टेक्केवारी आता ३९.२९ वर घसरली आहे.

बांगलादेश सहाव्या स्थानी घसरल्याने श्रीलंका ४२.८६ च्या सरासरीने टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आणि ४२.१९ च्या सरासरी टक्केवारीसह इंग्लंड पाचव्या क्रमांकावर आले आहेत.न्यूझीलंड तिसऱ्या क्रमांकावर कायम आहेत. त्यांची ५० अशी सरासरी टक्केवारी आहे.

शेवटच्या तीन स्थानांवर अनुक्रमे दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज आहेत. सातव्या क्रमांकावरील दक्षिण आफ्रिकेची ३८.८९ टक्केवारी आहे, तर आठव्या पाकिस्तानची १९.०५ टक्केवारी आहे. सर्वात शेवटी म्हणजेच नवव्या क्रमांकावर असलेल्या वेस्ट इंडीजची १८.५२ टक्केवारी आहे.

Team India
शतक अन् ६ विकेट्स! R Ashwin ने घरचं मैदान गाजवलं; कर्टनी वॉल्श यांचा विक्रम मोडला, तर शेन वॉर्नशी बरोबरी

भारताचा सोपा विजय

चेन्नई कसोटीत भारताने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ९१.२ षटकात सर्वबाद ३७६ धावा केल्या होत्या. त्यानंतर बांगलादेश संघ पहिल्या डावात केवळ १४९ धावाच करू शकल्याने भारताला २२७ धावांची आघाडी मिळाली होती.

दुसरा डाव भारताने ६४ षटकात ४ बाद २८७ धावांवरच घोषित केला. त्यामुळे भारताने बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला दुसऱ्या डावात ६२.१ षटकात सर्वबाद २३४ धावाच करता आल्या.

Related Stories

No stories found.