WTC 2025 Points Table: श्रीलंकेचा न्यूझीलंडला कसोटीत पराभवाचा धक्का; आता फायनलसाठी थेट भारत-ऑस्ट्रेलियाला टक्कर?

WTC Points Table After Sri Lanka vs New Zealand 1st Test: श्रीलंकेने न्यूझीलंडला कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का दिला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाँइंट्स टेबलमध्येही बदल झाले आहेत.
Sri Lanka Test Team
Sri Lanka Test TeamSakal
Updated on

World Test Championship 2023-25 latest update: न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील गॉलला झालेल्या पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंडला पराभवाचा धक्का दिला आहे. श्रीलंकेने हा सामना ५३ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

श्रीलंका आणि न्यूझीलंड संघात होत असलेली ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचाही भाग आहे. त्यामुळे श्रीलंकेने मिळवलेल्या विजयानंतर टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाँइंट्स टेबलमध्येही मोठे बदल झाले आहेत.

या विजयानंतर आता श्रीलंकेने न्यूझीलंडला टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाँइंट्स टेबलमध्ये मागे टाकले आहे. श्रीलंका आता न्यूझीलंडला मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत. श्रीलंकेने ८ सामने खेळले असून ४ सामने जिंकले आहेत, तर ४ सामने पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांची सरासरी टक्केवारी ५० अशी आहे.

Sri Lanka Test Team
SL vs NZ 1st Test: ६ दिवसांच्या कसोटीत न्यूझीलंडची हार; CSK चा फलंदाज लढला, Prabath Jayasuriya च्या ९ विकेट्सने सामना फिरवला

तसेच न्यूझीलंड आता चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. न्यूझीलंडने ७ सामन्यांमध्ये ३ सामन्यांत विजय आणि ४ सामन्यांत पराभव स्विकारला आहे. त्यामुळे ते आता ४२.८६ सरासरी टक्केवारीसह चौथ्या क्रमांकावर आहेत.

पाँइंट्सटेबलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक कायम राखून आहेत. भारतीय संघाने १० सामन्यांमध्ये ७ विजय मिळवले आहेत. तसेच भारताच्या विजयाची सरासरी टक्केवारी ७१.६७ आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने १२ सामन्यांपैकी ८ सामने जिंकले असून त्यांची सरासरीने टक्केवारी ६२.५० अशी आहे.

दरम्यान, श्रीलंकेने केलेली वाटचालीमुळे आता फायनलमध्ये प्रवेशासाठी शर्यत वाढली आहे. सर्वच संघांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमधील शेवटच्या काही मालिका शिल्लक आहेत. त्यामुळे चुरस वाढली आहे.

सध्या भारत-बांगलादेश ही कसोटी मालिकाही सुरू आहे आणि दुसरीकडे श्रीलंका - न्यूझीलंड कसोटी मालिकाही सुरू आहे. त्यामुळे पुन्हा पाँइंट्स टेबलमध्ये नंतर मोठे बदल होऊ शकतात.

Sri Lanka Test Team
Pakistan Cricket: पाकिस्तानला क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का! WTC मधील मालिका तोंडावर असताना मीडिया हक्कच कोणी खरेदी करेना

सध्या या पाँइंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर इंग्लंड आहे. त्यांचे ४२.१९ सरासरी टक्केवारी आहे. त्यापाठोपाठ सहाव्या क्रमांकावर बांगलादेश आहे. बांगलादेशची ३९.२९ सरासरी टक्केवारी आहे.

सातव्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका असून त्यांची ३८.८९ टक्केवारी आहे, तर आठव्या स्थानावरील पाकिस्तानची १९.०५ टक्केवारी आहे. शेवटी नवव्या क्रमांकावर असलेल्या वेस्ट इंडीजची १८.५२ टक्केवारी आहे.

श्रीलंकेचा विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत श्रीलंकेने ९१.५ षटकात सर्वबाद ३०५ धावा केल्या होत्या. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात ९०.५ षटकात सर्वबाद ३४० धावा करत ३५ धावांची आघाडी मिळवली होती.

दुसऱ्या डावात श्रीलंकेने ९४.२ षटकात सर्वबाद ३०९ धावा केल्या. पण पहिल्या डावातील पिछाडीमुळे त्यांनी न्यूझीलंडसमोर २७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ७१.४ षटकात २११ धावांवर सर्वबाद झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.