WTC 2025: भारतानं मालिका तर हरलीच, पण Points Table मधील अव्वल नंबरही धोक्यात; न्यूझीलंड आता कोणत्या स्थानी?

India in WTC 2023-25 Points table: भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध पुण्यात झालेल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करला. त्यामुळे याचा परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाँइंट्स टेबलवरही झाला असून भारताचं आता अव्वल स्थानही धोक्यात आलं आहे.
WTC 2025 Points Table | India vs New Zealand 2nd Test in Pune
WTC 2025 Points Table | India vs New Zealand 2nd Test in PuneSakal
Updated on

India vs New Zealand Test: शनिवारी (२६ ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ११३ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. पुण्यात झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळण्याबरोबरच मालिकेतही २-० अशी आघाडी घेत विजय निश्चित केला आहे.

दरम्यान, ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचाही (WTC 2023-25) भाग आहे, त्यामुळे या सामन्याच्या निकालाचा परिणाम स्पर्धेच्या पाँइंट्स टेबलवरही झाला आहे.

सध्या भारतीय संघ सलग दुसऱ्या पराभवानंतरही अव्वल क्रमांकावर कायम आहे. मात्र आता भारताच्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या विजयी टक्केवारीमध्ये अवघ्या काही पाँइंट्सचा फरक राहिला आहे. त्यामुळे भारताचा आता हा अव्वल क्रमांकही धोक्यात आला आहे.

WTC 2025 Points Table | India vs New Zealand 2nd Test in Pune
IND vs NZ: जैस्वालचं शतक हुकलं, पण रचले मोठे विक्रम! विराट-गावसकर सारख्या दिग्गजांनाही टाकलं मागे
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.