WTC Final Scenarios: अव्वल असूनही टीम इंडियाचे फायनलमधील स्थान पक्के नाही; शर्यतीत अजूनही तगडे स्पर्धक

ICC World Test Championship 2024-25 : सध्याच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये (WTC) फक्त १२ मालिका शिल्लक आहेत. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्याची शर्यत खूपच रोमांचक होत आहे.
WTC scenarios
WTC scenariosesakal
Updated on

Team India WTC Final Scenarios : जागतिक अजिंक्यपद स्पर्धा २०२३-२५ ची फायनल लॉर्ड्सवर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील १२ मालिका अजून बाकी आहेत आणि गेल्या WTC Final मध्ये पोहोचलेले भारत आणि ऑस्ट्रेलिया हे सध्या आघाडीवर आहेत. मागील WTC मध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत हे अनुक्रमे ६६.६७ आणि ५८.८ टक्के गुण मिळवून फायनलमध्ये पोहोचले होते. अशा परिस्थितीत यंदाच्या WTC च्या अंतिम फेरीच्या शर्यतीत असलेल्या सर्व संघांना किमान ६० टक्के गुण मिळवावे लागणार आहे.

श्रीलंका ४२.८६ टक्के गुणांसह अजूनही शर्यतीत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या मागील कसोटीत विजय मिळवल्यानंतर त्यांची शक्यता बळावली आहे. श्रीलंकेला उर्वरित मालिकेत न्यूझीलंड (घरच्या मैदानावर दोन कसोटी सामने), दक्षिण आफ्रिका (घरच्या मैदानावर दोन कसोटी सामने), ऑस्ट्रेलिया (घरच्या मैदानावर दोन कसोटी सामने) या संघाविरुद्ध खेळावे लागणार आहे. त्यांनी उर्वरित सर्व सामने जिंकले, तर ते अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित करू शकतात. सर्व सामने जिंकल्यानंतर त्यांचे गुण ६९.२३ टक्के होतील आणि अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी हे पुरेसे असू शकते. सहापैकी पाच सामने जिंकल्यास ते ६१.५४ गुणांपर्यंत पोहोचू शकतील, ज्यामुळे ते अंतिम फेरीच्या शर्यतीत कायम राहतील.

Sri Lanka Cricket Team
Sri Lanka Cricket TeamSakal

इंग्लंडचे ४२.१९ टक्के गुम आहेत आणि उर्वरित मालिकेत त्यांना पाकिस्तान ( ३ कसोटी अवे) व न्यूझीलंड ( ३ कसोटी अवे ) यांचा सामना करायचा आहे. ओव्हलवर श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडचा पराभव म्हणजे या WTC सायकलमध्ये ते आता ६० टक्क्यांचा टप्पा ओलांडू शकणार नाहीत. आता ते जास्तीत जास्त ५७.९५ टक्के गुण मिळवू शकतात. त्यासाठी त्यांना उर्वरित सहा कसोटी सामने जिंकावे लागतील. पण, त्याचवेळी भारताचा पराभव त्यांच्या फायद्याचा ठरू शकतो.

England Cricket
England Cricket Sakal

बांगलादेश ४५.८३ टक्के गुण आहेत आणि उर्वरित सामन्यांत भारत ( २ कसोटी सामने अवे ), वेस्ट इंडिज ( २ कसोटी सामने अवे ), दक्षिण आफ्रिका ( घरच्या मैदानावर २ कसोटी सामने) यांच्याशी भिडणार आहेत. पाकिस्तानविरुद्ध २-० च्या शानदार विजयामुळे बांगलादेशचे सध्या ४५.८३ टक्के गुण झाले आहेत. या गुणांसह तो गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी त्यांचे उर्वरित सर्व कसोटी सामने जिंकले तर त्यांचे ७२.९२ टक्के गुण होतील.

पाकिस्तान संघ फायनलच्या शर्यतीतून बाद आहे. त्यांचे १९.०५ टक्केच गुण आहेत. त्यांना उर्वरित मालिकेत इंग्लंड ( घरच्या मैदानावर ३ कसोटी), दक्षिण आफ्रिका ( २ कसोटी अवे), वेस्ट इंडिज ( घरच्या मैदानावरील २ कसोटी ) सामने खेळायचे आहेत.

Pakistan Cricket AI.
Pakistan Cricket AI.esakal

भारतीय संघ ६८.५२ टक्के गुणांसह सध्या आघाडीवर आहे. त्यांना उर्वरित मालिकेत बांगलादेश ( घरच्या मैदानावर २ कसोटी ), न्यूझीलंड ( घरच्या मैदानावर ३ कसोटी आणि ऑस्ट्रेलिया ( ५ कसोटी सामने अवे ) यांच्याशी खेळायचे आहे. त्यांना ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळवायचे असतील तर त्यांना पाच विजय आणि एक ड्रॉ आवश्यक आहे.

ऑस्ट्रेलिया ६२.५० टक्के गुणासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना उर्वरित मालिकेत भारत ( घरच्या मैदानावर ५ कसोटी) आणि श्रीलंका ( २ कसोटी अवे) यांच्याविरुद्ध खेळायचे आहे. त्यांना त्यांच्या उर्वरित सात कसोटी सामन्यांमध्ये ६०% गुणांच्या आत राहण्यासाठी चार विजय किंवा तीन विजय आणि तीन अनिर्णित निकाल आवश्यक आहे. भारताविरुद्धची मालिका यासाठी महत्त्वाची आहे.

IND vs AUS 4th Test Live Cricket Score in marathi india-vs-australia-4th-test-2023-match-at-narendra-modi-stadium-news
IND vs AUS 4th Test Live Cricket Score in marathi india-vs-australia-4th-test-2023-match-at-narendra-modi-stadium-news ESAKAL

न्यूझीलंड ५०टक्के गुणासह अजूनही शर्यतीत आहे आणि त्यांना उर्वरित मालिकेत श्रीलंका ( २ कसोटी अवे), भारत ( ३ कसोटी अवे) आणि इंग्लंड ( घरच्या मैदानावर ३ कसोटी) यांच्याविरुद्ध खेळायचे आहेत. या WTC सायकलमध्ये न्यूझीलंडने त्यांच्या १४ पैकी फक्त सहा कसोटी सामने खेळले आहेत. त्यांच्या उर्वरित आठ कसोटी सामन्यांपैकी पाच आशियाई भूमीवर आहेत. त्यांना शेवटपर्यंत ६०% गुण गाठायचे असेल, तर त्यांना पाच विजय व ड्रॉ असे निकाल नोंदवावे लागतील.

दक्षिण आफ्रिका ३८.९९ टक्के गुणांसह अजूनही शर्यतीत आहे. उर्वरित मालिकेत त्यांना श्रीलंका ( घरच्या मैदानावर २ कसोटी ), पाकिस्तान ( घरच्या मैदानावर २ कसोटी ), बांगलादेश ( २ कसोटी अवे) यांच्याविरुद्ध खेळायचे आहे. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या पुढील सहा कसोटी सामन्यांपैकी प्रत्येक जिंकल्यास, ते ६९.४४ वर पूर्ण करतील, जे त्यांना अंतिम फेरीत घेऊन जाईल.

nz vs sl 1st test match thrilling New Zealand beat Sri Lanka team India enters WTC final cricket news kgm00
nz vs sl 1st test match thrilling New Zealand beat Sri Lanka team India enters WTC final cricket news kgm00

वेस्ट इंडिजचे १८.५२ गुण आहेत आणि उर्वरित माललिकेत त्यांना बांगलादेश ( घरच्या मैदानावर २ कसोटी ) आणि पाकिस्तान ( २ कसोटी अवे) यांच्याशी खेळायचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.