IND vs AUS: यशस्वी जैस्वाल ठरला २०२४ मधील 'सिक्सर किंग', तर केएल राहुलसोबतही विक्रमी भागीदारी; पाहा रेकॉर्ड्स

Yashasvi Jaiswal 100 m. Six: यशस्वी जैस्वालने नॅथन लायनविरुद्ध पर्थ कसोटीत १०० मीटर लांब षटकार मारला. त्याचा हा षटकार विश्वविक्रमी ठरला आहे. याशिवाय त्याने केएल राहुलसोबत विक्रमी भागीदारीही केली.
Yashasvi Jaiswal Six | Australia vs India Perth Test
Yashasvi Jaiswal Six | Australia vs India Perth TestSakal
Updated on

KL Rahul and Yashasvi Jaiswal Partnership: पर्थ कसोटीचा दुसरा दिवस भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने गाजवला आहे. शुक्रवारपासून ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी दोन्ही संघातील गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले.

मात्र दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १०४ धावांवर संपुष्टात आल्यानंतर मात्र दोन्ही सत्र यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी गाजवली.

या दोघांनी दुसऱ्या दिवस अखेर पर्यंत विकेट न गमावता भारताच्या दुसऱ्या डावात तब्बल १७२ धावांची नाबाद भागीदारी केली. त्यामुळे ही भागीदारीही विक्रमी ठरली आहे. याशिवाय जैस्वालनेही षटकारांच्या बाबतीत मोठा विश्वविक्रम केला आहे.

Yashasvi Jaiswal Six | Australia vs India Perth Test
IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.