IND vs BAN: टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये एकाला नाही, तर यावेळी दोघांना मिळालं 'फिल्डिंग मेडल'; BCCI ने शेअर केला Video

IND vs BAN test series: भारताने बांगलादेशविरूद्धची मालिका २-० ने जिंकली. ज्यामध्ये फिल्डींगचे महत्वपूर्ण योगदान आहे.
best feilding award
best feilding awardesakal
Updated on

Fielder of the series Medal : बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताने फलंदाजी व गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणामध्येही सर्वोत्तम कामगिरी केली. भारताने पूर्ण मालिकेत बहूमुल्य झेल केले. भारतीय खेळाडूंनी संपूर्ण मालिकेत एकूण २३ झेल केले. त्यातील बहुतेक झेल हे अवघड होते. परंतु चांगले प्रयत्न आणि सरावामुळे भारतीय खेळाडूंनी हे अवघड झेल शक्य करून दाखवले. ज्यामध्ये सर्वोतकृष्ट झेल करणाऱ्या मोहम्मद सिराज आणि यशस्वी जैस्वालला 'फिल्डर ऑफ द सीरीज' मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

वनडे वर्ल्डकप २०२३ पासून भारतीय संघासाठी क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप यांनी ही प्रथा सुरू केली होती. तेव्हापासून आता प्रत्येक द्विपक्षीय मालिकेनंतरही भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला हे मेडल दिले जाते. मालिकेनंतर एकाला हे मेडल दिले जाते. पण यंदा दोघांना मेडल देण्यात आले. विजेत्यांची घोषणा करताना टी दिलीप यांनी त्यांच्यासह इतर खेळाडूंनी दाखवलेल्या चांगल्या क्षेत्ररक्षण कौशल्याचेही कौतुक केले.

best feilding award
ICC Test Ranking: बुमराहने अश्विनला मागे टाकत पटकावला पहिला नंबर! जैस्वाल-विराटनेही घेतली मोठी झेप

भारतीय खेळाडूंना नेहमीच आपण टी दिलीप यांच्या मार्गदर्शनाखाली फिल्डींगचा सराव करताना पाहतो व त्याचे परिणाम आपल्याला सामन्यादरम्यान पहायला मिळतात. याचा प्रत्यय आपल्याला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आला आहे. भारतीय खेळाडूंनी बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत अप्रतिम झेल पकडले आहेत.

यशस्वी जैस्वालने पूर्ण मालिकेमध्ये एकूण ४ अप्रतिम झेल पकडले. त्यामुळे त्याला 'बेस्ट फिल्डर' मेडल देऊन सन्मानित करण्यात आले, तर मागे उडी मारत डाव्या हातामध्ये झेल पकडणाऱ्या मोहम्मद सिराजलाही देखील 'बेस्ट फिल्डर' मेडल देण्यात आला. सिराजने पकडलेला हा झेल फारच अवघड होता. चेंडू उंच उडाला होता आणि सिराज चेंडूखालीही नव्हता. परंतु त्याने मागच्या बाजूला झेप घेत एका हाताने झेल घेतला आणि शाकिब अल हसनला माघारी पाठवले. असे झेल अवघड असतात, पण सिराजने ते शक्य करून दाखवले.

मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने पकडलेला लिटन दासचा झेलही चांगला होता. ३० यार्ड सर्कलवर उभ्या असलेल्या कर्णधार रोहित शर्माने उडी मारत एकहाती झेल घेतला. रोहितचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

त्याव्यतिरिक्त शुभमन गिल , केएल राहुल, रविंद्र जडेजाने देखील मालिकेमध्ये सुंदर झेल केले. एकंदरीतच भारतीय खेळाडूंनी या मालिकेत अष्टपैलू कामगिरी केली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतील अडीच दिवस वाया गेले असतानाही भारताने मालिका २-० ने जिंकून दाखवली. ज्यामध्ये गोलंदाजी, गोलंदाजीसोबतच फिल्डींगचाही भारताच्या विजयात महत्वाचा वाटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.