Yashasvi Jaiswal ने सुनील गावसकरांचा विक्रम मोडला, सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत जाऊन बसला

Yashasvi Jaiswal Breaks Sunil Gavaskar Record : भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीदरम्यान सुनील गावसकरांचा एक मोठा विक्रम मोडला असून नवा विक्रम रचला आहे.
Yashasvi Jaiswal and Rishabh Pant
Yashasvi Jaiswal and Rishabh Pant Sakal
Updated on

India vs Bangladesh 1st test: चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश संघात गुरुवारपासून (१९ सप्टेंबर) पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यादरम्यान, भारताचा स्टार युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने मोठा कारनामा केला आहे.

या सामन्यात जैस्वालने पहिल्या डावात एका बाजूने झटपट विकेट्स जात असताना सुरुवातीला भारताचा डाव सांभाळला होता. त्याने ऋषभ पंतबरोबर चौथ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारीही केली होती. यादरम्यान, त्याने ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. पण त्याला नाहिद राणाने बाद केले होते.

त्यानंतर दुसऱ्या डावात त्याला फार खास काही करता आले नाही आणि तो अवघे १० धावा करून नाहिद राणाविरुद्धच खेळताना यष्टीरक्षक लिटन दासकडे झेल देत बाद झाला. त्यामुळे या सामन्यात त्याला दोन्ही डावात मिळून ६६ धावा करता आल्या.

Yashasvi Jaiswal and Rishabh Pant
IND vs BAN 1st Test : Yashasvi Jaiswal ने इतिहास रचला; कसोटीत ८९ वर्षांत असा पराक्रम कोणालाच नाही जमला

यशस्वी जैस्वाल दिग्गजांच्या यादीत सामील

ही जैस्वालची कारकिर्दीतील दहावा कसोटी सामना होता. त्यामुळे त्याने कारकि‍र्दीत पहिल्या १० कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलर यांना मागे टाकत चौथा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या आता १० कसोटीत ६४.३५ च्या सरासरीने ३ शतके आणि ५ अर्धशतकांसह १०९४ धावा झाल्या आहेत.

त्यामुळे तो कारकिर्दीतील पहिल्या १० कसोटीत १००० धावांचा टप्पा पार करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी पहिल्या १० कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर सुनील गावसकरांच्या नावावर होता. त्यांनी पहिल्या १० कसोटीत ९७८ धावा केल्या होत्या.

तसेच कारकिर्दीतील पहिल्या १० कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या जगातील एकूण क्रिकेटपटूंच्या यादीत अव्वल क्रमांकावर सर डॉन ब्रॅडमन आहेत. त्यांनी १४४६ धावा केल्या होत्या.

पहिल्या १० कसोटीत सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू

  • १४४६ धावा - डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)

  • ११२५ धावा - इव्हर्टन विक्स (वेस्ट इंडिज)

  • ११०२ धावा - जॉर्ज हेडली (वेस्ट इंडिज)

  • १०९४ धावा- यशस्वी जैस्वाल (भारत)

  • १०८८ धावा - मार्क टेलर (ऑस्ट्रेलिया)

Yashasvi Jaiswal and Rishabh Pant
IND vs BAN: Virat Kohli ची विकेट वादग्रस्त ठरली, पण पठ्ठ्याने १७ धावा करूनही मोठा पराक्रम केला

चेन्नई कसोटीत भारताचे पारडे जड

चेन्नई कसोटीत बांगलादेशने नाणेफेक जिंकली होती आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद ३७६ धावा केल्या, त्याच्या प्रत्युत्तरात बांगलादेश संघ पहिल्या डावात सर्वबाद १४९ धावाच करू शकला.

त्यामुळे भारताला २२७ धावांची आघाडी मिळाली. पण भारताने फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी भारतीय संघ पुन्हा दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. मात्र दुसरा दिवस संपला, तेव्हा भारतानेही २३ षटकात ३ विकेट्स गमावल्या होत्या आणि ८१ धावा केल्या होत्या. पण भारताकडे दुसऱ्या दिवस अखेर ३०८ धावांची आघाडी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.