India vs England 3rd Test : इंग्लंडविरुद्धच्या राजकोट कसोटीत यशस्वी जैस्वालने इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 10 षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाठीच्या दुखापतीमुळे यशस्वीने मैदान सोडले होते. पण शुभमन गिल धावबाद झाल्यानंतर चौथ्या दिवशी मैदानावर आला तेव्हा तो त्याच लयीत होता.
यशस्वी जैस्वालने भारतीय खेळाडू म्हणून कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी नवज्योत सिंग सिद्धू आणि मयंक अग्रवाल यांना मागे टाकले आहे. जैस्वालने एका डावात 10 षटकार मारले आहेत. तर 1994 मध्ये लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात सिद्धूने 8 षटकार ठोकले होते. यानंतर मयंक अग्रवालने 2019 मध्ये इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात एका डावात 8 षटकार मारण्याचा विक्रम आहे.
यासोबतच यशस्वी जैस्वालने एका मालिकेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला आहे. या प्रकरणात त्याने कर्णधार रोहित शर्माला मागे सोडले आहे. रोहितने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत 19 षटकार मारले होते, मात्र आता यशस्वीने 20 षटकार मारून हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडविरुद्ध अजून दोन कसोटी सामने बाकी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.