IND vs NZ: जैस्वालचं शतक हुकलं, पण रचले मोठे विक्रम! विराट-गावसकर सारख्या दिग्गजांनाही टाकलं मागे

Yashasvi Jaiswal Fifty Records : भारताचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने पुणे कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक करत अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
Yashasvi Jaiswal Fifty | India vs New Zealand 2nd Test
Yashasvi Jaiswal Fifty | India vs New Zealand 2nd TestX/BCCI
Updated on

India vs New Zealand 2nd Test in Pune: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात पुण्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत यशस्वी जैस्वालने शानदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकले आणि अनेक विक्रम केले आहेत. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर ३५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून दुसऱ्या डावात जैस्वालने ६५ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांसह ७७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ९ चौकार आणि ३ षटकार मारले. जैस्वालने आक्रमक खेळताना ४१ चेंडूतच त्याचे अर्धशतक केले होते. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी भारताकडून सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम त्याने केला.

Yashasvi Jaiswal Fifty | India vs New Zealand 2nd Test
IND vs NZ: 'Virat Kohli जर देशांतर्गत सामना खेळला असता तर...'; दुसऱ्या कसोटीतील अपयशानंतर अनिल कुंबळे स्पष्टच बोलला
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.