Yashasvi Jaiswal : 300 वेळा एकच शॉट... किरकोळ दिसणाऱ्या यशस्वीच्या पॉवर हिटिंग भरूचांचे कष्ट

Yashasvi Jaiswal India Vs England : यशस्वीने कसोटीच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केलीये.
Yashasvi Jaiswal Power Hitting
Yashasvi Jaiswal Power Hitting
Updated on

Yashasvi Jaiswal Six Hitting Ability : भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालची शरीरयष्टी ही तशी किरकोळ आहे. तो अवघ्या 22 वर्षाचा आहे. मात्र त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा भीमपराक्रम केला. त्याने वसिम अक्रमच्या एका डावात 12 षटकार मारण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली.

यशस्वी जैस्वाल ज्यावेळी राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता त्यावेळी तो फारसे षटकार मारत नव्हता. मात्र कालांतराने त्याचा गेम बदलला अन् तो आता भारताचा सर्वात आक्रमक सलामीवीर झाला आहे. तो तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये धडाकेबाज फलंदाजी करतोय. त्याच्या या ट्रान्सफॉर्मेशनमागं राजस्थान रॉयल्सच्या एका कोचचा मोठा वाटा आहे.

Yashasvi Jaiswal Power Hitting
Dhanashree Verma Jhalak Dikhla Jaa: 'वहिनी आम्ही तुमच्या पाठीशी! चहलच्या पत्नीला धनश्रीला कोणकोणत्या क्रिकेटर्सचा मिळाला पाठींबा?

महाराष्ट्रातील तळेगावमध्ये एका निर्जन ठिकाणी यशस्वी जैस्वाल दिवसभर एकच फटका 300 वेळा मारण्याचा सराव करत होता. त्याने क्रिकेटमधील अखोरेखित होत चाललेल्या पॉवर गेमचं कसब शिकण्याासठी बेसबॉल कोचचा देखील सल्ला घेतला होता.

तो आपला पॉवर गेम सुधारण्यासाठी तळहाताला फोडं येईपर्यंत तासंतास सराव करत होता. राजस्थान रॉयल्सच्या आपल्या सुरूवातीच्या काळात तो चेंडू दूरवर फटकावण्याचा कसून सराव करू लागला.

यामध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक आणि मुंबईचे माजी फलंदाज झुबेन भरूचा यांनी मोलाची भुमिका बजावली. त्यांनी यशस्वीवर घेतलेल्या कष्टामुळेच आज तो कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांची बरसात करतोय.

Yashasvi Jaiswal Power Hitting
Yashasvi Jaiswal IND vs ENG : मला मैदान सोडायचं नव्हत मात्र... सामन्यानंतर यशस्वी असं का म्हणाला?

भरूचा यांना यशस्वीमध्ये विशेष गुणवत्ता असल्यांच सुरूवातीच्याच काळात लक्षात आलं होतं. जैस्वालने एकच फटका खेळला होता अन् भरूचांचे लक्ष वेधून घेतलं होते.

भरूचा यशस्वीबद्दल बोलताना म्हणाले होते की, 'तो भारताच्या 19 वर्षाखालील संघाकडून खेळून आला होता. मात्र आयपीएलमधील क्रिकेट हे वेगळ्या दर्जाचं क्रिकेट आहे. तो ट्रायलसाठी आला अन् त्याने पहिलाच चेंडू हा फ्लिक केला. मी फर्स्ट इप्रेशनवर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी त्याची पुढची फलंदाजी पाहिली देखील नाही. त्याची ती वर्चस्व गाजवण्याची वृत्ती मला भावली.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.