Yashasvi Jaiswal : जैस्वालचा अजून एक मोठा विक्रम! राहुल द्रविडला मागं टाकत पोहचला विराट कोहलीच्या जवळ

Yashasvi Jaiswal Record India Vs England : भारताच्या पहिल्या डावात एकट्या फलंदाजाने चांगली फलंदाजी केली तो म्हणजे यशस्वी जैस्वाल. त्याने सलग दोन द्विशतकी खेळीनंतर आता 73 धावांची खेळी केली आहे.
Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswal
Updated on

Yashasvi JasiwalIND vs ENG Ranchi Test : भारताची सलामीवीर यशस्वी जैस्वालने रांची कसोटीत 73 धावांची खेळी करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र बशीर आणि टॉम हार्टली यांनी भारताच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताची अवस्था 7 बाद 177 धावा अशी केली.

दरम्यान, यशस्वी जैस्वालने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा एक मोठा विक्रम मोडला. यशस्वी जैस्वाल आता इग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

Yashasvi Jaiswal
Musheer Khan Ranji Trophy : सर्फराजचा भाऊच तो... द्विशतक ठोकत मुशीरनं मुंबईला पोहचवलं मजबूत स्थितीत

भारताकडून इंग्लंडविरूद्धच्या एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने 655 धावा केल्या होत्या. यानंतर 603 धावा करणाऱ्या राहुल द्रविडचे नाव होते. मात्र आता त्याला मागे टाकून यशस्वी जैस्वालने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

भारताकडून इंग्लंविरूद्धच्या एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  1. विराट कोहली - 655 धावा

  2. यशस्वी जैस्वाल - 604 धावा

  3. राहुल द्रविड - 602 धावा

Yashasvi Jaiswal
Hardik Pandya IPL 2024 : अरे भाई अ‍ॅडजस्ट नही होता हैं.... गुजरात टायटन्स सोडणाऱ्या पांड्याचा VIDEO लिक?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()