Yashasvi Jaiswal Test Record : गावसकर, विराट अन् कांबळी सर्वांचे रेकॉर्ड यशस्वीच्या रडावर... चौथ्या कसोटीत विक्रमांचा पाऊस?

Yashasvi Jaiswal Test Record IND vs ENG : यशस्वी जैस्वाल चौथ्या कसोटीत मोठी खेळी करून अनेक विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे.
Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswalesakal
Updated on

Yashasvi Jaiswal Set To Break Plenty Test Record In 4th Test IND vs ENG : भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने सलग दोन कसोटीत द्विशतकी खेळी केली आहे. त्याने विशाखापट्टणम आणि राजकोट कसोटीत द्विशतक ठोकले.

यशस्वीने आता कुठं सुरू झालेल्या कसोटी कारकिर्दीत 7 सामन्यात 13 डावात 861 धावा ठोकल्या आहेत. तिसऱ्या कसोटीत तर यशस्वीने पाठदुखीचा त्रास असतानाही एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. विसम अक्रमच्या नावावर एकाच कसोटी डावात सर्वाधिक 12 षटकार मारण्याचा विक्रम होता.

आता चौथ्या रांची येथे होत असलेल्या कसोटीत यशस्वी जैस्वाल हा सुनिल गावसकर, विराट कोहली आणि विनोद कांबळीचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.

Yashasvi Jaiswal
Ind vs Eng : बुमराह बाहेर गेला पण टेन्शन वाढलं! आता 'ही' जबाबदारी रोहितसोबत कोणाच्या खांद्यावर?

सुनिल गावसकरांचा विक्रम मोडण्याची संधी

यशस्वी जैस्वालच्या रडावर पहिला विक्रम महान फलंदाज आणि माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांचा असेल. सुनिल गावस्कर हे द्विपक्षीय कसोटी मालिकेत 700 किंवा त्याहून अधिक धावा करणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे.

गावस्कर यांनी दोनदा ही कामगिरी केली, 1970-71 च्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्यांनी 774 धावा केल्या आणि 1978-79 च्या मालिकेत 732 धावा केल्या. हा विक्रम पार करण्यासाठी जयस्वालला आणखी 229 धावांची गरज आहे.

विराटचा विक्रम मोडणार?

यशस्वी जैस्वाल विराट कोहलीचा 692 धावांचा विक्रम मागे टाकण्याचे ध्येय ठेवणार आहे, ही 21 व्या शतकातील द्विपक्षीय कसोटी मालिकेतील भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. 2016/17 च्या घरच्या मालिकेत इंग्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर नोंदवला गेला आहे.

या मालिकेत त्याने 655 धावा केल्या. यशस्वी जर पुढच्या दोन डावात ११० धावा करण्यात यशस्वी झाला तर तो हा विक्रम मोडेल. नाहीतर धरमशाला येथे होणाऱ्या शेवटच्या कसोटीत त्याच्याकडे एक पर्याय शिल्लक राहील.

Yashasvi Jaiswal
IND vs ENG 4th Test Ranchi Pitch : ना विराट, ना राहुल, ना बुमराह तरी अडीच दिवसात संपणार सामना ? रोहित शर्माचा प्लॅन बी तयार

विनोद कांबळीच्या विक्रमाशी बरोबरी

यशस्वी जैस्वाललाही विनोद कांबळीसह सर्वात जलद 1000 कसोटी धावा पूर्ण करणारी भारतीय खेळाडू बनण्याची संधी आहे. कांबळीने अवघ्या 14 डावात ही कामगिरी केली होती. कांबळीच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी जैस्वालला पुढील डावात १३९ धावांची गरज आहे.

जर त्याने या सामन्यात हजार धावा पूर्ण केल्या तर तो सर्वात कमी कसोटी सामन्यात 1000 धावा पूर्ण करणारा भारताचा सर्वात वेगवान आणि जगातील दुसरा वेगवान खेळाडू देखील होईल.

भारतात हा विक्रम चेतेश्वर पुजाराच्या नावावर आहे तर जगात हा विक्रम डॉन ब्रॅडमनच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या ब्रॅडमनने 7 सामन्यात 1000 धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला होता.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.