''तो कोळसाच आहे...''; Arjun Tendulkar च्या भविष्यावर योगराज सिंग यांचा 'तो' वादग्रस्त Video Viral

Yograj Singh controversial video : भारताचा स्टार अष्टपैलू युवराज सिंग याचे वडील योगराज हे त्यांच्या बिनधास्त बेधडक विधानांनी नेहमी चर्चेत राहिले आहेत.
Yograj Singh
Yograj Singhesakal
Updated on

Yograj Singh's controversial Arjun Tendulkar : भारताचे माजी क्रिकेटपटू योगराज सिंग हे सध्या जरा जास्तच चर्चेत आहेत. एका पोडकास्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महेंद्रसिंग धोनी व कपिल देव या भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारांवर जोरदार टीका केली. आता त्यांनी महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन याच्या भविष्याबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे.

योगराज यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांना सचिन तेंडुलकरच्या मुलगा अर्जुनच्या भविष्याबाबत विचारले गेले. अर्जुन तेंडुलकरने योगराज यांच्याकडूनही काहीकाळ क्रिकेटचे धडे गिरवले होते. त्यामुळेच योगराज यांच्या विधानाने नवा वाद निर्माण होऊ शकतो.

arjun Tendulkar Yograj
arjun Tendulkar Yograjesakal

या व्हिडीओत त्यांनी म्हटले की,''आपने हिरा देखा है कोयले की खान मे? वो कोयला ही है ( तुम्ही कोळशाच्या खाणीत हिरा पाहिला असेल ना? तो कोळसाच आहे...)'' योगराज यांच्या या विधानाची आता नेटिझन्स जोरदार चर्चा करत आहेत. काहींनी योगराज यांच्यावर टीका केली आहे.

MS Dhoni ने मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं...

''मी धोनीला कधीच माफ करणार नाही. त्याने त्याचा चेहरा आरशात पाहायला हवा. तो खूप मोठा क्रिकेटपटू आहे, परंतु त्याने माझ्या मुलासोबत जे केलं, ते आता समोर येत आहे. या माणसाने माझ्या मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त केले. तो आणखी ४-५ वर्ष सहज खेळला असता. युवराज सिंगसारखा खेळाडू होणे नाही, असे गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवागने म्हटले आहे. कॅन्सर असताना तो खेळला आणि भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला, त्याला भारतरत्न द्यायला हवं,''असे योगराज म्हणाले. Zee Switch YouTube चॅनेलला त्यांनी मुलाखत दिली.

युवीचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल

योगराज यांच्या मुलाखतीनंतर युवराज सिंगचा नोव्हेंबर २०२३ चा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तो BeerBiceps पॉडकास्टवर त्याच्या वडिलांबद्दल विधान करताना दिसतोय... त्यात त्याने म्हटले होते की, माझ्या वडिलांमध्ये मानसिक समस्य आहे आणि त्यांना त्याचा स्वीकार करायचा नाही. यावर त्यांनी लक्ष द्यायला हवं, परंतु ते हे मान्य करत नाहीत.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.