पाकिस्तानी करतात भारताची कॉपी! युवकाने टिपला सूर्यकुमारसारखा झेल, झाला फेमस

Sensational Catch : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमधील सूर्यकुमार यादवच्या कॅचने सामन्याचा निकालच बदलून टाकला
Young Pakistani boy catch becomes viral sensation
Young Pakistani boy catch becomes viral sensationsakal
Updated on

Sensational Catch by young pakistani boy on a hill - ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाच्या विजयाचा नायक सूर्यकुमार यादव ठरला. डेव्हिड मिलरचा त्याने घेतलेल्या अविश्वसनीय झेलने भारताने गमावलेला सामना खेचून आणला. सूर्यकुमारच्या त्या झेलची जादू आजही आणि वर्षानुवर्षे तशीच कायम राहणारी आहे. भारताने १७ वर्षांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. सूर्याच्या या झेलची आता पाकिस्तानातील युवा कॉपी करताना दिसत आहेत.

पाकिस्तानातील एका स्थानिक क्रिकेट सामन्याची जगभरात चर्चा होताना दिसतेय. कालच माजी कर्णधार वासिम अक्रम याने पाकिस्तानात एक लहान मुलगा भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याची स्टाईल कॉपी करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. आज सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये युवा खेळाडूने सूर्यकुमारने घेतलेल्या झेलसारखा झेल टिपला आहे.

Young Pakistani boy catch becomes viral sensation
Rohit Sharma, Virat Kohli यांनी आणखी एक वर्ष खेळायला हवं होतं, पण...; दिलीप वेंगसरकर यांचं स्पष्ट मत, गौतम गंभीरकडून अपेक्षा

डोंगराच्या कुशीत काही मुलं क्रिकेट खेळत आहेत आणि फलंदाजाने मारलेलला चेंडू बराच वेळ हवेत राहिल्याचे दिसतेय. यष्टिरक्षक तो टिपण्याच्या दिशेने पळत सुटला आणि त्याने सूर्यासारखा अफलातून झेल घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com